कॅटरिना कैफ तिच्या चित्रपटांच्या रिलीजपूर्वी दर्ग्यावर जावून 'मन्नत' मागणे विसरत नाही. पण यावेळी 'बार बार देखो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने कॅटरिनाला दर्ग्यावर जावून चादर चढवणे जमले नाही. पण वेळ मिळाला तसा रिलीजच्या चारदिवसानंतर कॅटरिना फतेहपूरसीक्रीच्या हजरत चिश्ती दर्ग्यावर माथा टेकण्यासाठी पोहोचली. याठिकाणी कॅटरिनाने चादर चढवत, 'मन्नत'चा धागाही बांधला. पांढºया शुभ्र रंगाचा सूट घातलेल्या कॅटरिनाने यादरम्यान स्वत:चा चेहरा पूर्णपणे ओढणीने झाकून घेतला होता. याऊपरही कॅटरिनाच्या चाहत्यांनी तिची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. 'बार बार देखो'मध्ये कॅटरिना सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसत आहे. चित्रपटाचे रिव्ह्यू चांगले नाहीत. पण कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने नवाजुद्दीन सिद्दीकीच्या 'फ्रीकी अली'ला पछाडले...आता कॅटरिनाला या यशापेक्षा आणखी काय हवे??