कतरिना कैफने शेअर केले 'करवा चौथ'चे Photos! सासूसोबतच्या फोटोंनी वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 10:17 IST2024-10-21T09:56:41+5:302024-10-21T10:17:54+5:30
कतरिनाच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे. गुलाबी रंगाच्या साडीत ती कमाल दिसत आहे.

कतरिना कैफ (Katrina Kaif) भारतातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. तिच्या सौंदर्याची कायम भरभरुन स्तुती होते. साडीत तर तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.
विकी कौशलशी लग्न केल्यानंतर कतरिना सर्व सण साजरे करते. विकीच्या कुटुंबासोबतचे तिचे फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात.
काल करवा चौथ सण साजरा झाला. करवा चौथ म्हटलं की बॉलिवूडमध्ये एकच धूम असते. कतरिनानेही कुटुंबासोबत करवा चौथ साजरा केला. तिने पोस्ट केलेल्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
सासूसोबत तिने पहिला फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघीही करवा चौथसाठी तयार झाल्या आहेत. विकीच्या आईने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. कतरिना त्यांचा आशीर्वाद घेत आहे.
कतरिना लग्नानंतर सर्व सण अगदी मनापासून साजरे करताना दिसते. परदेशात जन्माला आली असूनही ती आता अगदी भारतीय झाली आहे. ती विकीसोबत त्याच्या आईवडिलांच्या घरीच राहते. सासू सासऱ्यांसोबत तिचा खास बाँड आहे.
तर आणखी एका फोटोत सासू सूनेचं प्रेम दिसून येतंय. विकीची आई कौतुकाने सूनेला पाहत आहे. तिचे लाड करत आहे. तसंच दोघींमधल्या बाँडने लक्ष वेधून घेतलंय.
गुलाबी रंगाच्या साडीत कतरिना अगदी नव्या नवरीप्रमाणेच दिसत आहे. सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र असा पारंपरिक लूक तिने केला आहे. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.