कपिलच्या अभिनयाचं दिग्गज अभिनेत्याकडून कौतुक, कॉमेडियन म्हणाला सर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:59 PM2023-03-21T14:59:29+5:302023-03-21T15:12:31+5:30

नंदिता दास दिग्दर्शित 'झ्विगॅटो' 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्माने या चित्रपटात मेन लीड एक्टरची भूमिका निभावली आहे. त्यामुळे, सर्वांच्या नजरा याकडे होत्या.

नंदिता दास दिग्दर्शित 'झ्विगॅटो' 17 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्माने या चित्रपटात मेन लीड एक्टरची भूमिका निभावली आहे. त्यामुळे, सर्वांच्या नजरा याकडे होत्या.

'झ्विगॅटो' (Zwigato) चित्रपटातून कपिल शर्माच्या रुपाने सामान्य माणसाचं संघर्षपूर्ण आयुष्य पडद्यावर मांडलं आहे. ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी कपिल शर्माच्या 'झ्विगॅटो' चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत.

'झ्विगॅटो' ने पहिल्या दिवशी केवळ 42 लाखांची कमाई केली आहे. निर्मात्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत, मात्र, चित्रपटाला तेवढा प्रतिसाद मिळाला नसून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला आहे.

टोरंटो आणि बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘झ्विगॅटो’चे प्रीमियर झाले. तेव्हापासूनच हा चित्रपट चर्चेत होता. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ‘झ्विगॅटो’ चित्रपटाचं कौतुक केलं.

अभिनेता कार्तिक आर्यनने देखील या चित्रपटात कॅमिओ केला आहे. ‘प्यार का पंचनामा’ दिग्दर्शक फेम लव्ह रंजनने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

मात्र, कपिलचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला नाही. पण, कपिलच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. कपिलने सर्वसाधारण डिलीव्हरी बॉयच्या कॅरेक्टरला न्या दिल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

तर, कपिलला तगडं आव्हान जोरकसपणे पेलता आलं नसल्याचंही काहीचं म्हणणं आहे. पण, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आशुतोष राण यांनी ट्विटरवरुन कपिल शर्माच्या अभिनयाचं कौतु केलंय.

जो हास्य करण्यात निपूण आहे, पीडाही व्यक्त करू शकतो, जो गाणंही सिद्धतापूर्ण गातो, तो नृत्यातही कुशल आहे. जो पडद्यावरही प्रभावी आहे आणि पडद्याच्या मागेही प्रभावशाली आहे. तो पूर्ण रुप कलाकार असतो.

कपिल शर्माच्या झ्विगाटो चित्रपटातील भूमिकेचं आशुतोष राणा यांनी अशा शब्दात कौतुक केलंय. त्यामुळे, कपिलने खरंच या चित्रपटातील भूमिकेला न्याय दिलाय, असे अनेकांनी वाटतंय.

दरम्यान, कपिलनेही आशुतोष राणा यांचे आभार मानले आहेत, तुमच्यासारख्या महान कलाकाराकडून असं कौतुक होणं ही खूप भाग्यशाली गोष्ट आहे, असे कपिलने म्हटले आहे. तसेच, आभारही व्यक्त केले.