बॉलीवुडमध्ये पुन्हा 'लगीनघाई', आमीर खानच्या लेकीचा साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 20:01 IST2022-11-18T19:23:57+5:302022-11-18T20:01:14+5:30

बॉलिवुडचा मिस्टर पर्फेशनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान चा बॉयफ्रेंड नुपुर शिखारे सोबत साखरपुडा आज मुंबईत पार पडला. नुपुर शिखारे आयराचा फिटनेस ट्रेनरही आहे. अनेक बॉलिवुड सिनेमांमध्ये नुपुरने स्टंट केले आहेत.

लाल रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये आयरा खुपच सुंदर दिसत आहे. तर नुपुरने काळ्या रंगाचा कोट घातला असुन तो नेहमीसारखाच एकदम फीट दिसत आहे.

मुलीच्या साखरपुड्यात आमिर खानच्या लुकचीही जोरदार चर्चा आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालुन आमिर खान कुल लुक मध्ये दिसत आहे.

आमिर खान ची दुसरी पत्नी किरण राव देखील साखरपुड्यात सहभागी झाल्या. तर त्यांच्यासोबत मुलगा आझादही आला होता.

जाने तु या जाने ना फेम अभिनेता इम्रान खान साखरपुड्यात सहभागी झाला. इम्रान आमिर खान चा भाच्चा आहे. सध्या तो बॉलिवुजमधुन गायब असून त्याला ओळखणेही आता कठीण आहे.

दंगल फेम फातिमा सना शेख पांढऱ्या रंगाच्या स्कर्ट आणि स्टायलिश ब्लाऊजमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

आमिर खानची पहिली पत्नी आणि आयराची आई रीना दत्ता या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसल्या. मुलीच्या साखरपुड्याप्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता.