ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर! पाहा सुपरस्टार महेश बाबूचा डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 03:22 PM2023-03-10T15:22:17+5:302023-03-10T15:28:17+5:30

Mahesh babu: महेश बाबू त्याच्या फिटनेसच्या बाबतीत चांगलाच सजग आहे. त्यामुळे तो त्याच्या डाएटकडे आणि वर्कआऊटकडे जातीने लक्ष देतो.

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. नुकताच त्याने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला.

१९९९ मध्ये महेश बाबूने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ओक्काडू या चित्रपटातून त्याने दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं.

साऊथचा हँण्डसम हंक असलेल्या महेश बाबूने ४८ व्या वर्षात पदार्पण केलं असलं तरीदेखील त्याचा फिटनेस २५ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे.

महेश बाबू त्याच्या फिटनेसच्या बाबतीत चांगलाच सजग आहे. त्यामुळे तो त्याच्या डाएटकडे आणि वर्कआऊटकडे जातीने लक्ष देतो.

फिट राहण्यासाठी महेश बाबू कोणता डाएट प्लॅन घेतो ते पाहुयात.

महेश बाबू सकाळी ब्रेकफास्टमध्ये ओट्स, अंडी, सुकामेवा आणि ताजी फळं यांचा समावेश करतो.

लंचमध्ये महेश बाबूला प्रोटीन रिच फूड, लीन मीट आणि कार्ब्सयुक्त पदार्थ यांचा समावेश करायला आवडतो.

महेश बाबू रात्रीच्या जेवणात फार मोजक्या पदार्थांचा समावेश करतो. यात चिकन, डाळ किंवा सूप यांचा समावेश असतो.

महेश बाबूने बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं आहे.