शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:55 PM2024-01-24T17:55:10+5:302024-01-24T17:59:21+5:30

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात.

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान नेहमीच आपल्या बॉडीगार्डने घेरलेला असतो. त्याच्या सुरक्षेची खास काळजी त्याचा बॉडीगार्ड रवी घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख त्याच्या बॉडीगार्डला वर्षाला २.७ कोटी रुपये पगार देतो.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा त्याच्यासोबत सावलीसारखा वावरत असतो. तो सलमानसोबत गेल्या २५ वर्षांपासून एकत्र आहे आणि जवळपास तो त्याच्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शेरा वर्षाला २ कोटी रुपये पगार घेतो.

फायटरमुळे चर्चेत असलेली दीपिका पादुकोणच्या बॉडीगार्डचं नाव जलाल आहे. तो तिचा बॉडीगार्ड असण्यासोबत मानलेला भाऊदेखील आहे. ती त्याला राखी बांधते. रिपोर्ट्सनुसार, ती वर्षाला त्याला १.२ कोटी रुपये सॅलरी देते.

आलिया भटच्या सुरक्षेची जबाबदारी सुनील तालेकरने घेतली आहे. तो कित्येक वर्षांपासून तिच्यासोबत काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार, आलिया भट वर्षाला त्याला ५० लाख रुपये सॅलरी देते.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा बॉडीगार्ड जितेंद्र शिंदे प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत सावलीसारखा असतो. रिपोर्ट्सनुसार, जवळपास १.२ कोटी रुपये वर्षाला पगार बिग बी बॉडीगार्डला देतात.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सुरक्षेची काळजी युवराज घोरपडे घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज वर्षाला २ कोटी पगार घेतो.

अभिनेता अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचं नाव श्रेयस थेले आहे. तो कित्येक वर्षांपासून त्याची आणि कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घेतो आहे. त्याला वर्षाला १.२ कोटी सॅलरी आहे.

कतरिना कैफच्या बॉडीगार्डचं नाव दीपक सिंग आहे. त्याला वर्षाला १ कोटी रुपये सॅलरी आहे.