रितेश देशमुख, अजय देवगण ते करिना कपूर पर्यंत, "या" बॉलिवूड कलाकारांनी नावाचे स्पेलिंग बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:09 PM2024-01-30T16:09:38+5:302024-01-30T16:50:49+5:30

अनेक कलाकारांनी आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केले आहेत.

अभिनेता आयुषमान खुराना त्याचं नाव इंग्रजी लिहिताना स्पेलिंगमध्ये दोन वेळा एन (n) आणि आडनावाच्या स्पेलिंगमध्ये दोन वेळा आर (r) लिहितो. वडिलांच्या इच्छेनुसार त्यानं नाव बदललं होतं.

अभिनेता तुषार कपूरने सुद्धा नावात बदल करून घेतला. तुषारने Tushar या स्पेलिंगमध्ये अजून एक Sचा वापर करत Tusshar असं केलं आहे.

अजय देवगण आपल्या आडनावाची स्पेलिंग Devgn अशी लिहितो. अजयने आपल्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला. अजयने आपल्या आडनावातून A हे अक्षर वगळले आणि त्यानंतर त्याला यश मिळत गेलं. नंतरच्या काळात एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट अजयने प्रेक्षकांना दिले आहेत.

एकेकाळी आपल्या सौंदर्यानं आणि दमदार अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री करिश्मा कपूरनेही तिच्या नावाचं स्पेलिंग बदललं आहे. करिश्माने तिच्या नावातून H काढून टाकले. पूर्वी ती Karishma लिहायची, आता ती फक्त Karisma लिहिते.

अभिनेता रितेश देशमुखने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारा रितेश हा अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. रितेशनेही आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. त्याने आपले नाव ritesh वरून riteish असे बदलले आहे.

सुनील शेट्टीने आपल्या नावात E हे अक्षर वाढवलं आहे. त्यामुळे Sunil ची स्पेलिंग Suniel अशी झाली आहे.

अभिनेता राजकुमार रावने त्याच्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करुन घेतला होता. त्याने आपल्या नावात आणखी एक M टाकले होते.

अभिनेता जावेद जाफरी खरी स्पेलिंग ही Javed Jaffrey अशी होती. त्यात बदल करत त्याने Javed मध्ये A हे अक्षर वाढवलं आहे. तर Jaffrey मध्ये त्यानं A हे अक्षर वाढवलं आणि एक FREY काढून टाकलं. त्यात ERI जोडलं. आता त्याच नाव Jaaved Jaaferi असं आहे.

जिमी शेरगिल हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडशिवाय त्यानं अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यानं आपल्या आडनावत I हे अक्षर वाढवलं आहे.

ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा हिचा जन्म करिना कपूरच्या जन्माच्या ६ दिवस आधी झाला होता. त्यावेळी देशात गणपती महोत्सव सुरू होता. या कारणास्तव त्यांचे आजोबा राज कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या मुलीचे नाव भगवान गणेशाच्या पत्नींच्या नावावर ठेवले. तर करीनाचा जन्म 6 दिवसांनी झाला तेव्हा राज कपूरने तिचे नाव सिद्धिमा ठेवले होते. पण, रणधीर आणि बबिता कपूर यांना त्यांच्या मुलीसाठी सिद्धिमा हे नाव आवडले नाही. या कारणास्तव त्यांनी आपल्या मुलीचे नाव बदलून करीना ठेवले. तर करीनाने आपल्या नावात kareena मध्ये E वगळून I लावले होते. पण, काही काळाने पुन्हा ती kareena हेच नाव लावण्यास सुरूवात केली.