'चाची ४२०' अन् 'इश्क' सिनेमांमध्ये दिसलेली 'ही' चिमुकली, आज गाजवतेय बॉलिवूड; ओळखलं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 17:15 IST2025-07-22T17:04:01+5:302025-07-22T17:15:58+5:30
कमल हासन, तब्बूसोबत 'चाची ४२०'मध्ये दिसली, गोड अभिनयाने सर्वच तिच्या प्रेमात पडले; आज तीच बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहे.

कमल हसन यांचा 'चाची ४२०' सिनेमा आठवत असेलच. यामध्ये त्यांनी वेषांतर केलेल्या चाची म्हणजेच आजीची भूमिका केली होती. हा सिनेमा प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडला होता.
९० च्या दशकात आलेला हा सिनेमा खूप हिट झाला होता. कमल हासन यांनी जयप्रकाश पासवानची भूमिका साकारली. तसंच अर्धा सिनेमा तेच वेषांतर केलेल्या चाची म्हणजे लक्ष्मी गोडबोलेच्या भूमिकेत होते. त्यांच्या दोन्ही भूमिका खूप गाजल्या.
सिनेमात तबू मुख्य अभिनेत्री होती. तसंच यामध्ये दिसलेली ही चिमुकली आठवतेय? या छोटीच्या अभिनयानेही लक्ष वेधून घेतलं होतं. भारती अशी तिची भूमिका होती.
ही चिमुकली आज बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे देत आहे. नुकतेच तिचे एकापोपाठ दोन सिनेमे रिलीज झालेत. दोन्ही सिनेमात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
ही अभिनेत्री आहे फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh). फातिमाला आपण 'दंगल' सिनेमामुळे ओळखतो. मात्र तो तिचा पहिला सिनेमा नव्हे. तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे.
'चाची ४२०' मध्ये ती फक्त ४ वर्षांची होती. याशिवाय 'इश्क','वन टू का फोर','बडे दिलवाला' या सिनेमांमध्येही ती बालकलाकार होती.
नंतर २०१६ मध्ये फातिमा 'दंगल'मध्ये झळकली. गीता फोगाटच्या भूमिकेतून तिने लक्ष वेधलं. या सिनेमाने तिला ओळख मिळवून दिली.
नुकतेच फातिमाचे 'आप जैसा कौई' आणि 'मेट्रो इन दिनो' हे सिनेमेही रिलीज झाले आहेत. आप जैसा कोई मध्ये तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक होत आहे. आर माधवनसोबत तिची केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.