गायक, अभिनेता, दिग्दर्शक अन् लेखकही आहे हा स्टार; 7 वर्षांनी लहान मराठी मुलीसोबत दुसरं लग्न अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 11:53 AM2024-01-09T11:53:21+5:302024-01-09T12:02:58+5:30

या मल्टिटॅलेंटेड कलाकाराचा आज ५० वाढदिवस आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा फरहान अख्तर (Farhan Akhtar) तरुणाईचा लाडका कलाकार आहे. फरहान आज 50 वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने त्याच्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया.

फरहान अख्तर केवळ अभिनेता नसून तो उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि गायकही आहे. 2008 साली त्याने 'रॉक ऑन' सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. त्याचा पहिलाच सिनेमा तुफान गाजला. तर 2011 साली त्याने 'जिंदगी ना मिलेही दोबारा' मध्ये काम केलं. यामध्येही त्याचा अभिनय प्रेक्षकांना भलताच आवडला. या सिनेमातील कविता त्याने स्वत: लिहिल्या होत्या.

2021 साली आलेल्या 'भाग मिल्खा भाग' सिनेमात तर त्याने कमालच केली. फिटनेस आणि अभिनय अशा दोन्ही बाबतीत तो वरचढ ठरला. हा त्याच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट आहे. या सिनेमासाठी त्याचं आजही कौतुक होतं.

फरहानने दिग्दर्शनातही नाव कमावलं आहे. 'दिल चाहता है' या ऑल टाईम सुपरहिट सिनेमाचा तो दिग्दर्शक आहे. शिवाय 'डॉन','डॉन 2','लक्ष्य' या सिनेमांचंही दिग्दर्शन त्याने केलं. सध्या तो 'डॉन 3' वर काम करत आहे.

मधल्या काळात फरहानने अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'वजीर', दीपिका पदुकोणसोबत 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' या सिनेमात काम केले. 'दिल धडकने दो' मध्येही तो दिसला. 'वजीर' मधील त्याने बिग बींसोबत गायलेलं गाणं 'अतरंगी यारी' खूप गाजलं. नुकताच त्याचा प्रियंका चोप्रासोबत 'स्काय इज पिंक'रिलीज झाला होता.

फरहानचं प्रोफेशनल आयुष्य चांगलं सुरु असतानाच वैयक्तिक आयुष्यात मात्र काही चढ उतार आले. 2000 साली फरहान अधुना भाबानी सोबत लग्नबंधनात अडकला होता. त्यांचं लव्हमॅरेज होतं. त्यांना शाक्य हा मुलगा आणि अकिरा ही मुलगीही झाली.

लग्नानंतर तब्बल १७ वर्षांनी 2017 मध्ये फरहान आणि अधुना यांनी घटस्फोट घेतला. दोन्ही मुलांची कस्टडी अधुनाला मिळाली. फरहानच्या आयुष्यातला हा सर्वात कठीण प्रसंग होता.

यानंतर फरहानने 'रॉक ऑन 2' मध्ये श्रद्धा कपूरसोबत काम केले. सिनेमावेळी दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा होती. मात्र श्रद्धाच्या कुटुंबाने या नात्याला विरोध केला आणि त्यांचं नातं तुटलं.

अखेर 2022 मध्ये फरहानच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं. मराठी कुटुंबात जन्माला आलेली ऑस्ट्रेलियन मॉडेल, गायिका शिबानी दांडेकरच्या तो प्रेमात पडला. शिबानी त्याच्यापेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. 2022 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

शिबानी आणि फरहान सध्या हॅपी कपल आहेत. दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.