साधी सोज्वळ 'दामिनी' आता दिसते खूप ग्लॅमरस; ६२ वर्षीय अभिनेत्रीच्या बोल्ड अदा पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:08 IST2025-12-18T13:55:38+5:302025-12-18T14:08:58+5:30

१९९३ साली आलेल्या 'दामिनी' सिनेमातील मिनाक्षी शेषाद्री आता ६२ वर्षांची झाल्या आहेत. मिनाक्षी यांचे ग्लॅमरस अदा असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

सनी देओलचा 'दामिनी' सिनेमा खूप गाजला. या सिनेमात दामिनी गुप्ताची प्रमुख भूमिका अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांनी साकारली.

'दामिनी' सिनेमात मिनाक्षी शेषाद्री यांनी अन्यायग्रस्त मुलीची भूमिका साकारली. या सिनेमात साध्या सोज्वळ लूकमध्ये दिसलेल्या मिनाक्षी वयाच्या ६२ व्या वर्षी ओळखू येणार नाही इतक्या बोल्ड दिसत आहेत.

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या मिनाक्षी अचानक इंडस्ट्रीतून गायब झाल्या. त्या सध्या काय करतात, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. मिनाक्षी सध्या मनोरंजन विश्वात काम करत नसल्या तरीही त्या सोशल मीडियावर सक्रीय आहेत.

मिनाक्षी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात पिंक कलरच्या ड्रेसमध्ये मिनाक्षी खूप सुंदर दिसत आहेत. मिनाक्षी यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी ग्लॅमरस लूक करुन सर्वांना थक्क केलं आहे.

१९९५ साली मिनाक्षी यांनी हरीश मैसुर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर मिनाक्षी यांनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला. सिनेसृष्टी सोडल्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही.

सध्या मिनाक्षी अमेरिकेतील टेक्सास येथे राहतात. या ठिकाणी मिनाक्षी यांची स्वतःची डान्स अकॅडमी असून त्या तिथे भरतनाट्यम, कथ्थकचं प्रशिक्षण देतात

मिनाक्षी मनोरंजन विश्वात सक्रीय नसल्या तरीही त्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात आहेत. ६२ व्या वर्षीही मिनाक्षी यांचं सौंदर्य थक्क करणारं आहे