अॅनिमेटेड सिनेमे पाहायला आवडतात? तर ओटीटीवरील हे चित्रपट एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:12 IST2025-08-04T16:54:46+5:302025-08-04T17:12:44+5:30
हे चित्रपट चुकवू नका!

भारतीय बॉक्स ऑफिसवर सध्या एक अॅनिमेटेड सिनेमा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय, तो म्हणजे 'महावतार नरसिंह' (Mahavatar Narsimha). या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.
पौराणिक संदर्भ, दमदार अॅनिमेशन आणि कथानक यामुळे प्रेक्षकांना नव्या स्वरूपात अध्यात्माचा आणि साहसाचा अनुभव मिळतोय. 'महावतार नरसिंह'ने अॅनिमेटेड चित्रपटांप्रती असलेली उत्सुकता पुन्हा वाढवली आहे.
जर तुम्हालाही अॅनिमेशन सिनेमे पाहायला आवडत असतील तर ओटीटीवर उपलब्ध असलेले काही जबरदस्त अॅनिमेटेड चित्रपट तुमच्या वॉच लिस्टमध्ये जरूर असायला हवेत.
दिल्ली सफारी (Delhi Safari, 2012) हा 3D अॅनिमेटेड अॅडव्हेंचर चित्रपट आहे. वाढत्या शहरीकरणामुळे जंगलावर अतिक्रमण केले जाते. हाच विषय प्राण्यांच्या माध्यमातून अतिशय निराळ्या पद्धतीने दिग्दर्शकाने यातून मांडला आहे.
रोडसाइड रोमिओ (Roadside Romeo) २००८ मध्ये प्रदर्शित झालेला एक मजेदार अॅनिमेटेड चित्रपट आहे. करीना, सैफ आणि जावेद जाफरी सारख्या लोकांनी रोडसाइड रोमियोला आवाज दिला आहे.
२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला महाभारत (Mahabharat) ही एक मजेदार आणि रंगीत कथा आहे, जी आपण सर्वजण ऐकत मोठे झालो आहोत. यामध्ये अर्जुन, भीम, द्रौपदी, कर्ण, दुर्योधन आणि श्रीकृष्ण ही सर्व पात्रे एका नवीन पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. परंतु कथा तीच क्लासिक आहे. अमिताभ बच्चन, अजय देवगण, विद्या बालन यांसारख्या कलाकारांनी यात आपला आवाज दिला आहे.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेला 'जम्बो' हा एक गोंडस आणि भावनिक अॅनिमेटेड चित्रपट आहे. ज्यात एका लहान हत्ती जम्बोची कथा पाहायला मिळते. अक्षय कुमारने जम्बोला आवाज दिला आहे. याशिवाय द लायन किंग, टॉय स्टोरी, इन्साईड आऊट, हाऊ टू ट्रेन युवर ड्रॅगन, कुंग फू पांडा, बाल गणेश, छोटा भीम असे अनेक लोकप्रिय चित्रपट तुम्ही पाहू शकता.
अर्जुन: द वॉरियर प्रिन्स (Arjun: The Warrior Prince) हा महाभारतातील अर्जुनवर आधारित 2D अॅनिमेटेड चित्रपट आहे. यामध्ये प्राचीन भारतातील पराक्रम दाखवण्यात आला.