'तान्हाजी'मधील सोयराबाईं खऱ्या आयुष्यात आहे खूपच बिंधास्त; पाहा इलाक्षी गुप्ताचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:30 AM2022-01-11T11:30:00+5:302022-01-11T11:30:00+5:30

Elakshi gupta: इलाक्षी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक डेंटिस्ट, फॅशन मॉडल, डान्सरदेखील आहे.

'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते.

काजोल, अजय यांनी साकारलेल्या भूमिकांप्रमाणेच या चित्रपटात आणखी एक भूमिका लक्षवेधी ठरली ती म्हणजे सोयराबाई यांची.

'तान्हाजी' या चित्रपटात अभिनेत्री इलाक्षी गुप्ताने सोयराबाईंची भूमिका साकारली होती.

या चित्रपटात महाराष्ट्रीयन लूकमध्ये झळकलेली इलाक्षी खऱ्या आयुष्यात प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली इलाक्षी कायम तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तान्हाजी चित्रपटात आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी इलाक्षीने प्रचंड मेहनत घेतली होती.

या चित्रपटात तिची भूमिका छोटेखानी होती. परंतु,तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

इलाक्षी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक डेंटिस्ट, फॅशन मॉडल, डान्सरदेखील आहे.

इलाक्षीला पर्यटनाची विशेष आवड असून अनेकदा ती नवनवीन ठिकाणांना भेटी देत असते.

इलाक्षी तिच्या फिटनेसकडेही प्रचंड लक्ष देते. (फोटो सौजन्य: इलाक्षी गुप्ता फेसबुक पेज)