'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वामिका गब्बीचा खास लूक; शेअर केले सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:40 IST2025-05-21T17:28:02+5:302025-05-21T17:40:33+5:30

वामिका गब्बीचा मनमोहक अंदाज, नव्या फोटोशूटची होतेय चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री वामिका गब्बी तिचा आगामी चित्रपट भूल चूक माफ च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

अलिकडच्या दिवसांमध्ये 'भूल चूक माफ' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, त्याला पीव्हीआर आयनॉक्सने विरोध केल्याने आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २३ मे ला हा सिनेमा थिएटरमध्ये जगभरात रिलीज करण्यात येणार आहे.

या चित्रपटामध्ये वामिका गब्बी अभिनेता राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

दरम्यान,सोशल मीडियावर वामिका गब्बी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

फिकट गुलाबी रंगाची साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज आणि त्यावर साजेसे कानातले असा लूक तिने केला आहे.

'भूल चूक माफ' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने हा खास लूक केला आहे. "जो है धडकन सबके दिल की जिसका नाम है तितली..." असं कॅप्शन अभिनेत्रीने तिच्या या फोटोंना दिलं आहे.