परी म्हणू की सुंदरा! सनी लिओनीच्या सौंदर्याची चाहत्यांना भुरळ, पाहा किलर फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:32 PM2024-01-31T16:32:52+5:302024-01-31T16:42:37+5:30

आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी आज चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

आपल्या बोल्डनेससाठी जगभरात प्रसिद्ध असलेली सनी हे एक नाव कायमच चर्चेत असते. तिची भारतामध्ये जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

सनी लिओनी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एक हिट बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या.

भारतामध्ये तिने आपल्या करिअरची सुरूवात ही बिग बाॅसपासून केलीये. यानंतर तिने 2012 मध्ये महेश भट्ट यांच्या जिस्म 2' या चित्रपटातून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.

सनी लिओन कधी पारंपरिक तर कधी ग्लॅमरस स्टाईलमध्ये तर कधी बोल्ड अवतारात पाहायला मिळते.

सोशल मीडियावर सनीचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

आता पुन्हा एकदा सनीने तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो पाहून लोक तिच्यापासून नजर हटवू शकत नाहीत.

नुकतंच सनीने निऑन कलरच्या ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. सनीचा हा पार्टी लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

.शेअर केलेल्या फोटोंमध्ये सनी लिओनीच्या दिलखेचक अदांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

सनीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.