Bhumi Pednekar : भूमि पेडणेकरचा 'पार्टी लुक'; सिल्व्हर गाऊनमध्ये दिसतेय खुपच 'हॉट'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 01:40 PM2022-12-13T13:40:29+5:302022-12-13T14:06:40+5:30

आपल्या अभिनयातुन लक्ष वेधुन घेणारी भूमि पेडणेकर आजकाल तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळेही चर्चेत असते.

नुकताच तिचा एक पार्टी लुक समोर आला आहे ज्याला तिने कॅप्शन दिले आहे 'फॉर द आफ्टर पार्टी'.

सिल्व्हर रंगाच्या गाऊन मध्ये भूमि खुपच हॉट दिसत आहे. तिने तो छान कॅरीही केला आहे.

मोकळे केस, डाउन कट, डीप नेक कट असलेला हा सिल्व्हर गाऊन बघून भूमिवरुन नजरही हटणार नाही.

तिने या गाऊनमध्ये अनेक फोटो पोस्ट केले आहेत. तिचे फोटो बघून दम लगा के हैशा मध्ये दिसलेली ही तीच भुमि आहे का असा प्रश्न पडेल.

पार्टी लुकमध्ये तिने काही ब्लर फोटोही पोस्ट केले आहेत. भूमिचे फोटो आजकाल चर्चेचा विषय बनले आहेत.

काही दिवसांपुर्वीच तिने अशाच एका सिल्न्हर डीप नेक गाऊनमध्ये फोटो पोस्ट केले होते.

भूमि आगामी 'गोविंदा नाम मेरा' या सिनेमात दिसणार आहे. यात विकी कौशल, किआरा अडवाणी यांच्याही भुमिका आहेत.

भूमिने सध्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे.