अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर, शेअर केले खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 05:01 PM2022-05-25T17:01:12+5:302022-05-25T17:18:38+5:30

Amrita Fadnavis in Cannes Film Festival: राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. तेथील रेड कार्पेटवरील काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या सध्या कान्स चित्रपट सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. तेथील रेड कार्पेटवरील काही खास फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावार प्रख्यात असलेल्या कान्स चित्रपट महोत्सवाला भारतातील फिल्मी जगतातील अनेक सितारे हजेरी लावत असतात. दरम्यान, यावेळच्या सोहळ्यात अमृता फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली आहे.

या चित्रपट सोहळ्यातील एका विशेष मोहिमेच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली.

या संदर्भातील माहिती अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

त्यात त्यांनी सांगितले की, अन्न, आरोग्य आणि निरंतरता याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी बेटर वर्ल्ड फंडने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉमिनिक ओयुटारा, राजकुमारी धिदा तलाल, अभिनेता शारोन स्टोन, चार्ली चॅप्लिन यांची नात अभिनेत्री कायरा चॅप्लिन यांच्यासह उपस्थितील लावली.

दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अमृता फडणवीस यांचा सहभाग आणि रेड कार्पेटवरील त्यांच्या हजेरीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

कान्स चित्रपट महोत्सवाचे हे ७५वे वर्ष आहे, त्यामुळे त्याची यावर्षीच्या जगभरातील चित्रपट जगतात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, कान्, चित्रपट सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झाल्यावर अमृता फडणवीस यांनी विमानतळावरूनच पोस्ट शेअर करत आपली उत्सुकता व्यक्त केली होती.