Sooryavansham : 100 वर्ष जुनी आहे ठाकूर भानू प्रताप यांची आलिशान हवेली, बघा खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:41 PM2023-01-24T16:41:58+5:302023-01-24T17:03:05+5:30

Balaram palace : सूर्यवंशम (Sooryavansham) या सिनेमाबाबत अनेक खास गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे या सिनेमात दाखवलेली हवेली. आज या हवेलीबाबत जाणून घेऊ.

Amitabh Bachcha Sooryavansham: बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत जे अजरामर झालेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे सूर्यवंशम. महत्वाची बाब म्हणजे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. पण टीव्हीवर याची सगळ्यात जास्त चर्चा झाली. या सिनेमाबाबत अनेक खास गोष्टी आहेत. त्यातील एक म्हणजे या सिनेमात दाखवलेली हवेली. आज या हवेलीबाबत जाणून घेऊ.

1999 मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चन यांच्या डबल रोल असलेल्या सूर्यवंशमची शूटींग गुजरातच्या बनारसकांठामध्ये झाली होती. ज्यासाठी निवडण्यात आला होता बलराम पॅलेस. हाच पॅलेस बनला होता ठाकूर भानू प्रताप यांची हवेली. जी बघून लोक बघतच राहिले होते.

या सिनेमाला येऊन 23 वर्षे झाली आहेत आणि इतक्या वर्षानी देखील ही हवेली जशीच्या तशी आहे. खास बाब म्हणजे या हवेलीचं निर्माण होऊन 100 वर्ष झाली आहेत. पण त्याची देखरेख अशी केली जात आहे की, आजही ती आलिशान महालापेक्षा कमी नाही. असं म्हणतात की, नवाब जेव्हा शासन करत होते तेव्हा या ठिकाणी शिकार करायला येत होते. त्यावेळी ही हवेली नवाब तल्ले मोहम्मद खान यांनी बांधली होती.

हा पॅलेस तयार करायला 14 वर्षांचा काळ लागला होता. 1922 मध्ये याचं काम सुरू झालं जे 1936 पर्यंत चाललं. आज या पॅलेसचे मालक हर्षदभाई मेहता आहेत. त्यांनी आधी या हवेलीचा जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर इथे हॉटेल बनवलं होतं.

इथे फिरायला येणाऱ्या टुरिस्टना इथं थांबणं आवडतं. तर हा महाल शूटींग आणि सिनेमासाठीही भाड्याने दिला जातो. सूर्यवंशम सिनेमासाठी हा महाल परफेक्ट लोकेशनवर होता. त्यामुळे याची निवड केली गेली होती. यात एकूण 34 खोल्या आहेत. इथे 1 महिना या सिनेमाचं शूटींग करण्यात आलं.

रात्रीच्या वेळी हवेली आणखीन सुंदर आणि आलिशान दिसते. जर बनारसकांठा जिल्ह्यात कधी फिरायला गेले तर या हवेलीला नक्की भेट द्या. एक लक्झरी अनुभव नक्कीच मिळेल. हा पॅलेस लग्नांसाठीही भाड्याने दिला जातो.