'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय सेनेच्या एअर स्ट्राईकवर आधारीत हे सिनेमे चर्चेत, तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:07 IST2025-05-07T13:45:05+5:302025-05-07T15:07:27+5:30

movies on air strike: भारतीय सेनेने एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानचा चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानिमित्ताने भारतीय मनोरंजन विश्वातील या सिनेमा आणि वेबसीरिजची चर्चा रंगली आहे

भारताने रात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन पाक दहशतवाद्यांची ९ तळी उद्धवस्त केली. ऑपरेशन सिंदूर नावाने हे मिशन राबवण्यात आलं. त्यानिमित्ताने मनोरंजन विश्वातील हे सिनेमे चर्चेत आहे

२०१९ ला उरी- द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा चांगलाच गाजला. विकी कौशलने या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली.

२०२० मध्ये अवरोध-द सीज विदइन ही वेबसीरिज रिलीज झाली होती. दिवंगत अभिनेते विक्रम गोखलेंनी या सीरिजमध्ये काम केलं होतं. बालाकोट एअरस्ट्राईकवर ही वेबसीरिज आधारीत होती.

फायटर सिनेमाही चांगलाच गाजला. या सिनेमात हृतिक रोशन, अनिल कपूर, दीपिका पादुकोण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकवर हा सिनेमा आधारीत होता.

२०२५ ला रिलीज झालेला स्काय फोर्स हा सिनेमाही सत्य घटनेवर आधारीत होता. १९६५ साली भारताने पाकिस्तानवर जी पहिली एअर स्ट्राईक केली त्यावर हा सिनेमा आधारीत होता.

बालाकोट एअरस्ट्राईक आणि भारतीय सेनेच्या अंतर्गत बाबींवर रणनीती या वेबसीरिजने प्रकाश टाकला होता. या वेबसीरिजच्या विषयाचंही चांगलंच कौतुक झालं

जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या गुंजन सक्सेना सिनेमाचीही चांगलीच चर्चा रंगली. कारगील युद्धात भारतीय वायुसेनेतून युद्धात सहभागी होणाऱ्या पहिल्या स्त्री पायलट गुंजन सक्सेन यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारीत होता