साधेपणात दडलेलं सौंदर्य! ३३ वर्षीय धुळ्याची मुलगी आज बॉलिवूडची धुरंधर अभिनेत्री, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 15:54 IST2026-03-14T15:32:59+5:302026-03-14T15:54:02+5:30
वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते.

वय वर्ष ३३ असलेली ही अभिनेत्री आज बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री ओळखली जाते. मराठी सिनेमात झळकलेली ही अभिनेत्री आज खऱ्या अर्थाने बॉलिवूडची धुरंधर हिरोईन ओळखली जाते.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मृणाल ठाकूर. मराठमोळ्या मृणाल ठाकूरने सोशल मीडियावर केलेलं सुंदर फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे

मृणाल ठाकूरने अनारकली ड्रेस परिधान केला आहे. या भरजरी ड्रेसमध्ये मृणाल ठाकूर अत्यंत सुंदर दिसत आहे.

मृणाल ठाकूरने हे फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. मृणाल ठाकूरला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

मृणाल ठाकूर लवकरच डकैत या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मृणालची जोडी आदिवी शेष या अभिनेत्यासोबत जमणार आहे.

मृणाल ठाकूर बॉलिवूडमध्ये सक्रीय असली तरीही ती मराठीपण विसरली नाही. ती जशी संधी मिळेल तशी जाहीर सोहळ्यांमध्ये बड्या हिंदी अभिनेत्यांसमोर मराठीत बोलताना दिसते.

उगाचच Hot किंवा बोल्ड अदा न दाखवता मृणाल साध्या सोज्वळ अंदाजात फोटोशूट करताना दिसते. मृणालचे चाहते तिचा प्रेम आणि आदर करतात.

















