चाळीशीत बांधली लग्नगाठ, दोन वर्षात घटस्फोट; वयाच्या ५४ व्या वर्षी रिलेशनशिपमध्ये अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 11:49 IST2025-01-12T11:39:54+5:302025-01-12T11:49:22+5:30
काही वर्षांपूर्वीच अभिनेत्रीने कॅन्सरवर मात करत फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक केलं.

मनोरंजनविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी वयाच्या चाळीशीत लग्न केलं. तसंच काहींचा त्यानंतरही घटस्फोट झाला आहे. अशीच एक टॉप अभिनेत्री जी सध्या एकटीच आयुष्य जगत आहे.
'हीरामंडी' सीरिजमधून दमदार कमबॅक करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला(Manisha Koirala). ९० च्या दशकात तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने मोठा चाहतावर्ग मिळाला होता.
मात्र मनीषाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. वयाच्या चाळीशीत तिने लग्न केलं, काही वर्षातच तिच्या घटस्फोट झाला आणि नंतर तिला कॅन्सरही झाला.
मनीषाने नुकतीच दिलेली मुलाखत व्हायरल होत आहे. यामधून मनीषा वयाच्या ५४ व्या वर्षी रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज लावला जात आहे. काय म्हणाली ती नक्की?
'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत मनीषा म्हणाली, "कोण म्हणालं माझ्याजवळ कोणीच नाही? हे योग्य आणि अयोग्यही आहे. कारण मी स्वत:ला चांगलं ओळखते. जर माझ्या आयुष्यात कोणी असलं तरी तरी त्याच्यासाठी मी तडजोड करणार नाही."
"जर तो माझ्यासोबत पाऊल टाकत चालणार असेल तर मी आनंदी राहीन. पण मी जे आयुष्य उभं केलं आहे ते मी बदलणार नाही. माझ्या आयुष्यात कोणी येणार असेल तर येईलच. सध्या मी आयुष्य छान जगत आहे आणि पुढेही अशीच जगेन अशी आशा आहे. मला माझ्या आवडीने स्वतंत्र जगायचं आहे."
मनीषाने २०१० साली वयाच्या ४० व्या वर्षी बिजनेसमन सम्राट दहलसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर २ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. २०१२ मध्ये तिला कॅन्सरचं निदान झालं. यातून बरी झाल्यानंतक २०१५ साली तिने 'चेहरे' मधून कमबॅक केलं.