एकेकाळी 'या' अभिनेत्याचं साधं बँक खातंही नव्हतं, तोच आज एका सिनेमासाठी घेतो 8 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 01:18 PM2023-05-19T13:18:51+5:302023-05-19T13:26:33+5:30

Bollywood actor: या अभिनेत्याने शाहरुखच्या माय नेम इज खान या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टरचं काम केलं होतं.

आज कलाविश्वात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात.

यात असे काही कलाकार आहेत ज्यांनी अगदी किरकोळ मानधनात त्यांच्या करिअरची सुरुवात केली. मात्र, आज तेच एका सिनेमासाठी कोटयवधी रुपये मोजतात.

सध्या सोशल मीडियावर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची चर्चा रंगली आहे.

सिद्धार्थने त्याच्या करिअरची सुरुवात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली. त्यानंतर तो सिनेमाकडे वळला.

सिद्धार्थने शाहरुखच्या माय नेम इज खान या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टरचं काम केलं होतं.

२०१२ मध्ये त्याने स्टुडंट ऑफ द इअर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

विशेष म्हणजे सिद्धार्थ आज टॉपचा अभिनेता आहे. मात्र, करिअरच्या सुरुवातीला त्याला फक्त ७ हजार रुपये पगार मिळत होता.

एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या पहिल्या सॅलरी आणि जॉबविषयी भाष्य केलं.

सिद्धार्थचं सुरुवातीला बँक अकाऊंटही नव्हतं. त्यामुळे त्याने त्याचा पहिला पगार आईकडे दिला होता.

आज सिद्धार्थ लोकप्रिय अभिनेता असून एका सिनेमासाठी तो कोटयवधी रुपये

काही काळापूर्वीच त्याने अभिनेत्री कियारा आडवाणीसोबत लग्नगाठ बांधली.

सिद्धार्थ त्याच्या एका सिनेमासाठी जवळपास ६ ते ८ कोटी रुपये चार्ज करतो.