२२ वर्षांच्या अवनीत कौरचं बोल्ड फोटोशूट!, चाहते झाले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 03:02 PM2024-05-21T15:02:02+5:302024-05-21T15:11:20+5:30

Avneet Kaur : टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारी २२ वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर सातत्याने चर्चेत येत असते.

टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा असा प्रवास करणारी २२ वर्षीय अभिनेत्री अवनीत कौर सातत्याने चर्चेत येत असते.

२०१० साली ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’मध्ये स्पर्धक बनून आलेल्या अवनीतने आत्तापर्यंत ७ टीव्ही मालिकांत काम केले आहे. ६ सिनेमांत झळकली आहे.

आता अवनीत कौर सोशल मीडियावरही सौंदर्याची जादू पसरवत असते. लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तिने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरेंट आउटफिटमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.

अवनीत कौरने काळी ब्रा घातली आहे आणि खाली मॅचिंग नेट स्कर्ट आहे. त्यामध्ये ती विविध प्रकारच्या आकर्षक पोज देत आहे.

३२ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेली ही अभिनेत्री गेल्या चार दिवसांपासून या फोटोशूटमधील फोटो शेअर करत आहे.

अवनीत कौरने आपल्या करिअरची सुरुवात 'डान्स इंडिया डान्स लियल मास्टर्स' सारख्या डान्स रिॲलिटी शोमधून केली, जिथे ती सेमीफायनलपर्यंत पोहोचली.

यानंतर तिने 'मेरी मां' हा टीव्ही शो केला, ज्यामध्ये तिने एक छोटीशी भूमिका केली होती. या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

अवनीतने 'सावित्री'मध्ये तरुण राजकुमारी दमयंतीची, 'एक मुठी आसमान'मध्ये तरुण पाखी आणि विशेषतः 'चंद्र नंदिनी'मध्ये राजकुमारी चारुमतीची भूमिका साकारली होती.

याशिवाय अवनीत कौरने 'मर्दानी २' आणि 'टिकू वेड्स शेरू' सारख्या बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.