12th फेल अभिनेत्याची पत्नीही आहे अभिनेत्री, पतीसोबत केलंय काम; लवकरच होणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 02:02 PM2024-01-13T14:02:21+5:302024-01-13T14:06:45+5:30

विक्रांत मेस्सी सध्या 12th फेल सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याच्या रिअल लाईफ पत्नीला पाहिलंय का?

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) 12th फेल सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याने IPS अधिकारी मनोज शर्माची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे.

'लुटेरा' सिनेमात रणवीर सिंहच्या मित्राच्या भूमिकेत तो दिसला होता. तेव्हा तो बॉलिवूडच्या नजरेत आला. शिवाय त्याने तापसी पन्नूसोबत 'हसीन दिलरुबा' मध्ये भूमिका साकारली. तर 'मिर्झापूर' मधील बबलू भैय्या या भूमिकेतून तो जास्त लोकप्रिय झाला.

विक्रांत मेस्सीची रिअल लाईफ पत्नी शीतल ठाकूरही (Sheetal Thakur) खूपच सुंदर आहे. शीतल सुद्धा अभिनेत्री आहे. तिने 2016 साली पंजाबी चित्रपट 'बंबूकट'मधून अभिनयात पदार्पण केले. यासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.

2018 मध्ये शीतलने 'ब्रिज मोहन अमर रहे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्याच वर्षी तिने 'बॅन्ड' सीरिजमधून ओटीटीवरही पदार्पण केले. 2018-19 साली आलेल्या अल्ट बालाजीच्या 'ब्रोकन बट ब्युटीफुल' या गाजलेल्या सीरिजमध्ये तिने भूमिका साकारली. याच सीरिजमध्ये विक्रांत मेस्सी होता.

ब्रोकन बट ब्युटिफुलचे दोन सीझन्स आले. या दोन्ही सीझन्समध्ये विक्रांत आणि शीतल यांच्या भूमिका होत्या. मात्र ते एकमेकांच्या अपोझिट नव्हते. तरी याच सीरिजदरम्यान त्यांची ओळख झाली. पुढे मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

2022 साली विक्रांत आणि शीतल लग्नबंधनात अडकले. अगदी मोजक्या लोकांसह मुंबईतील घरीच त्यांनी सातफेरे घेतले. आता शीतल गरोदर असून पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.

विक्रांत सध्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही आयुष्यात आनंदी आहे. 12th फेल ला मिळत असलेलं यश तो साजरं करतोय. तसंच खऱ्या आयुष्यात तो बाबा होणार असल्याने तोही आनंद द्विगुणित करणारा आहे.

नुकतंच विक्रांतने पत्नीसोबत एक फोटो शेअर केला. या फोटोत विक्रांतचा खोडकर अंदाज सर्वांनाच आवडला. कपलच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होतोय.