Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:04 IST2025-05-06T14:54:57+5:302025-05-06T15:04:23+5:30
Soniya Bansal : सोनिया बन्सलने तिच्या करिअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

बिग बॉस १७ मध्ये दिसलेल्या सोनिया बन्सलने तिच्या करिअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोडली आहे.
सोनियाने शोबिझपासू दूर जाण्याची घोषणा केली आहे. तिने आता आध्यात्मिक मार्ग निवडल्याचं सांगितलं आहे.
ईटाइम्सशी झालेल्या संभाषणात सोनियांनी तिच्या प्रायोरिटीबद्दल सांगितलं. स्वतःचा शोध, शांती आणि उद्देश यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.
आपल्या मोठ्या निर्णयाबद्दल बोलताना सोनिया म्हणाली की, "आपण इतरांसाठी सर्वकाही करण्यात व्यस्त असतो आणि स्वतःला विसरतो."
"मला आता जाणवले आहे की, मला आता माझा उद्देशही माहित नाही. परिपूर्ण होण्याच्या, संबंधित असण्याच्या आणि अधिक कमावण्याच्या शर्यतीत मी स्वतःला गमावलं."
"माझ्याकडे सगळं आहे... पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता. पण शांती नाही. जर आपल्याकडे शांतीच नसेल तेव्हा आपण इतक्या पैशांचे काय करणार?"
"तुमच्याकडे बाहेरचं सर्वकाही असू शकतं, पण आतून तुम्ही पोकळ आहात. ही खूप अंधार असलेली जागा आहे."
"जीवन म्हणजे काय? हे समजून घ्यायचं आहे. या इंडस्ट्रीने मला ओळख दिली आहे, पण मला स्थिरता दिली नाही."
"ते मला श्वास घेऊ देत नाही. आता मी दिखावा करू शकत नाही, मला वास्तवासोबत जगायचं आहे."
"मला लाइफ कोच आणि स्पिरिच्युएल हीलर व्हायचं आहे. आयुष्य कधी बदलेल किंवा मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहिती नाही" असं सोनियाने म्हटलं आहे.
अभिनेत्रीने डुबकी, शूरवीर, येस बॉस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पण तिला बिग बॉस १७ मधून ओळख मिळाली.