हाच का तो 'भूतनाथ'मधला बंकू? चिमुकल्यात झालाय कमालीचा बदल, आता ओळखताही येईना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:49 PM2024-02-02T15:49:07+5:302024-02-02T15:54:20+5:30

Aman siddiqui: अमनमध्ये आता कमालीचा बदल झाला असून त्याला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.

2008 मध्ये आलेला ‘भूतनाथ’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. हा सिनेमा मोठ्यांसह लहान मुलांमध्येही लोकप्रिय झाला होता.

सिनेमात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर त्यांच्यासोबत अमन सिद्धीकी या बालकलाकाराने ‘‘बंकू’ ही भूमिका साकारली होती.

गोड, निरागस चेहऱ्याच्या अमनने त्यावेळी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: राज्य केलं होतं. या सिनेमानंतर तो बऱ्याच बॉलिवूड सिनेमात झळकला.

हा सिनेमा रिलीज होऊन आता बरीच वर्ष झाली आहेत त्यामुळे हा बंकू आता काय करतो? कसा दिसतो? असे प्रश्न चाहत्यांना कायम पडतात.

अमन सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम त्याच्याविषय़ीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

अमनने शेअर केलेल्या फोटोवरुन तो सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. यावेळी तो गाण सादर करत आहे.

अमन कलाविश्वासापासून आता कोसो दूर आहे. मात्र, सोशल मीडियावर त्याच्या सिनेमांची कायम चर्चा रंगते.

अमनमध्ये आता कमालीचा बदल झाला असून त्याला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे.