आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 19:21 IST2025-01-25T19:15:24+5:302025-01-25T19:21:46+5:30

जनाई भोसले चित्रपटात अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. जनाई छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटात काम करणार आहे.

क्रिकेटर आणि बॉलिवूडच्या ललना यांचे नाते काही नवे नाही. अनेक क्रिकेटर्सची अफेअर्स हिरोईनींसोबत होती, काहींची लग्ने जुळली, काहींचे प्रेमसंबंध संपले. आता यात आणखी एक नाव जोडले जाऊ लागले आहे ते म्हणजे टीम इंडियाचा तेज तर्रार गोलंदाज मोहम्मद सिराजचे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या जनाई भोसले हिच्या बर्थडे पार्टीत सिराज दिसला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. ही जनाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात आहे.

जनाईने तिचा २३ वा वाढदिवस मुंबईत साजरा केला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी आले होते. परंतू, यात एक चेहरा सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा होता, तो म्हणजे सिराजचा. बरे असे नाही की सिराज पाहुणा म्हणून आला होता. तर या दोघांतील हास्य विनोदाची केमिस्ट्री बरेच काही सांगून जात होती.

या वाढदिवसाच्या पार्टीचे जनाईने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. तशी कोणाच्या परिचयाची नसलेली जनाई आता सिराजमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कारण सिराजसोबतच्या एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

जनाईने इतर क्रिकेटर जसे की श्रेयस अय्यरलाही पार्टीला इन्व्हाईट केले होते. परंतू, ती त्याच्यासोबत पोझ देण्यापुरतीच फोटो काढताना दिसली. पण सिराजसोबत तिचे हास्यविनोद रंगले होते. यामुळे हे दोघे डेट करत असावेत असा अंदाज लोकांनी लावण्यास सुरुवात केली आहे. अद्याप या दोघांपैकी कोणाकडून यावर खुलासा आलेला नाही. पण लोक समजायचे ते समजून गेले आहेत.

जनाई भोसले चित्रपटात अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश करणार आहे. जनाई छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटात काम करणार आहे. तिच्या वाढदिवसाला श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयश प्रभुदेसाई, अभिनेता जॅकी श्रॉफ आणि बिग बॉसची माजी स्पर्धक आयेशा खान हे देखील उपस्थित होते.