देवगण निर्मित सिनेमात नाना मुख्य भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 04:48 IST2017-03-17T04:48:02+5:302017-03-17T04:48:02+5:30

‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर, अजय देवगण आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे

Nana Main role in the movie of Devgan created | देवगण निर्मित सिनेमात नाना मुख्य भूमिकेत

देवगण निर्मित सिनेमात नाना मुख्य भूमिकेत

‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर, अजय देवगण आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे आणि विशेष म्हणजे, यात अभिनेता नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहे. अजयचा नवा मराठी सिनेमा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात नाना पाटेकर एका आगळ्या-वेगळ्या अंदाजात तुम्हा-आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरणार असल्याची माहिती आहे. अजय देवगणसोबतच खुद्द नाना आणि अभिनव शुक्ला हेही या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर मराठीतील प्रतिभावंत दिग्दर्शक सतीश राजवाडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा जिम्मा सांभाळणार आहेत. निश्चितपणे नानासोबत मराठीतील आणखी काही लोकप्रिय कलाकारांची या चित्रपटात वर्णी लागणार.

Web Title: Nana Main role in the movie of Devgan created