'माझी श्रीवल्ली'; नातवासोबत आजीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:50 IST2025-01-27T16:49:37+5:302025-01-27T16:50:13+5:30
सोशल मीडियावर एका आजीचा नातवासोबत डान्स करत असताना व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. आजीचा उत्साह बघून तुम्हालाही नवल वाटेल.

'माझी श्रीवल्ली'; नातवासोबत आजीचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Latest Viral Video: सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीस येईल आणि कोणाची चर्चा होईल सांगता येत नाही. एका व्हिडीओमुळे अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात आलेत. असाच एका आजीचा व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. आपल्या नातवासोबत डान्स करताना आजीचा उत्साह एखाद्या तरुणालाही लाजवणारा आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघितला, तर तुम्हालाही या आजीचे कौतुकच वाटले!
असं म्हणतात की वय वाढलं तरी माणसाचं मन तरुण असलं पाहिजे. आजीचा हा व्हिडीओ बघून याची प्रचिती येते. आपल्या नातवासोबत या आजीने पुष्पा २ चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.
अंगारो गाण्यावर आजी-नातवाचा डान्स
पुष्पा २ चित्रपटातील अंगारो गाण्यावर आजीने नातवासोबत डान्स केला. आधी आजी एकटीच नाचत होती. तिला साथ देण्यासाठी नातू समोर आला आणि दोघांनी खूपच सुंदर डान्स केला.
आजी-नातवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आला आणि आता तुफान व्हायरल होत हे. व्हिडीओत आजीचे डान्स करतानाचे चेहऱ्यावरील हावभाव सगळ्यांनाच आवडले.
माझ्या श्रीवल्लीसोबत असे या व्हिडीओवर ओळी आहेत. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला असून, लोक आजीचं कौतूक करत आहे. काहींनी हे किती क्यूट आहे, असेही म्हटले आहे.
अडीच मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
इन्स्टाग्रामवर @sanket_dawalkar या हॅण्डलवरून हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. या व्हिडीओला अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ४.६६ लाख लोकांनी लाईक केले असून, पाच हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.