'मस्तानी'च्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा टीझर रिलीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 20:38 IST2016-07-18T20:38:18+5:302016-07-18T20:38:18+5:30

दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये दीपिकाचा जबरदस्त आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे

'Mastani''s first Hollywood movie teaser release | 'मस्तानी'च्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा टीझर रिलीज

'मस्तानी'च्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचा टीझर रिलीज

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ : बॉलिवूडची मस्तानी अर्थातचं दीपिका पदुकोणच्या बहुचर्चित XXX: The Return of Xander Cage या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये दीपिकाचा जबरदस्त आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. दीपिकाच्या या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रलेर २ दिवसात प्रदर्शित करण्यात येणार आहे. दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचं टीझर पोस्ट केल आहे. 
 
दरम्यान, या टीझरने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हे टीझर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. दीपिकाचा या टीझरमधील अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला पडला आहे. दीपिकाचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे. टीझरमधील दीपिकाच्या अभिनयाने चाहत्यांची उत्सुकता अजून वाढवली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
 
४८ वर्षीय विन डीजेल यामध्ये 'Xander Cage' ची भूमिका निभावताना दिसणार आहे तर दीपिका 'Serena'च्या भूमिकेत दिसणार आहे. कॅनडामध्ये या चित्रपटाच शूटिंग झालं आहे. या चित्रपटासाठी दीपिकाने खूप मेहनत घेतली असून काही दिवसांपूर्वी तिच्या जिमममधील ट्रेनिंगचे फोटोही सोशल साईट्सवर झळकले होते.
 

Web Title: 'Mastani''s first Hollywood movie teaser release