मुजरा राजे! 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडे छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:08 IST2025-03-07T13:01:14+5:302025-03-07T13:08:23+5:30
अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेत आहे.

मुजरा राजे! 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडे छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
Ashwini Mahangade: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका चांगलीच गाजली. तब्बल पाच वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांना आपलंस केलं. दरम्यान, मालिकेत अनघा ही भूमिका साकारुन अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) प्रसिद्धीझोतात आली. अश्विनी सोशल मीडियावर कायमच चर्चेत येताना दिसते. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अश्विनी महांगडे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेच त्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही ती सहभागी होते. अशातच नुकतीच अश्विनीने तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानिमित्त तिने पोस्ट करुन लिहिलंय, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास…, #छत्रपती, #महाराज, #मुजरा राजं, #समाधी स्थळ अशी पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं कौतुकाचा वर्षाव केलं आहे.
छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने अभिनेत्री महाराजांच्या समाधीस्थली नतमस्तक झाली आहे. अत्यंत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले ठिकाण आहे.'आई कुठे काय करते' मालिकेनंतर आता अश्विनी एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती गडगर्जना नाटकात काम करते आहे. यात तिने राजमाता जिजाऊ माँसाहेबांची भूमिका साकारली आहे.