सुपरहिट मराठी सिनेमा 'येरे येरे पैसा ३' पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:34 IST2025-07-21T13:32:37+5:302025-07-21T13:34:56+5:30
सध्या गाजत असलेला 'येरे येरे पैसा ३' सिनेमा ९९ रुपयांत बघण्याची संधी, जाणून घ्या या खास ऑफरबद्दल

सुपरहिट मराठी सिनेमा 'येरे येरे पैसा ३' पाहा फक्त ९९ रुपयांत, कधी आणि कुठे? जाणून घ्या
'येरे येरे पैसा ३' हा सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झाला. या सिनेमाचे आधीचे दोन्ही भाग चांगलेच गाजले होते. त्यामुळे सर्वांना 'येरे येरे पैसा ३'ची खूप उत्सुकता होती. सिनेमाचं प्रमोशनही जोरात करण्यात आलं. त्यामुळे 'येरे येरे पैसा ३'च्या रिलीजची सर्वजण वाट बघत होते. सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अशातच 'येरे येरे पैसा ३' स्वस्तात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल
'येरे येरे पैसा ३' पाहा फक्त ९९ रुपयांत
'येरे येरे पैसा ३' सिनेमाची खास ऑफर नुकतीच लागू झाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आता फक्त ९९ रुपयांत बघायला मिळणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचताय. 'येरे येरे पैसा ३' च्या निर्मात्यांनी ही खास ऑफर सर्वांसोबत शेअर केली आहे. उद्या अर्थात मंगळवारी फक्त ९९ रुपयांत पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ही ऑफर फक्त उद्यापर्यंतच लागू आहे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा तुम्हाला फक्त ९९ रुपयांत बघता येईल. त्यामुळे 'येरे येरे पैसा ३' सिनेमाच्या कमाईतही चांगली वाढ होईल, यात शंका नाही.
'येरे येरे पैसा ३' सिनेमाविषयी
धर्मा प्रॉडक्शन्स प्रस्तुत अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर ॲरो पिक्चर्स निर्मित आणि वर्डविझार्ड एंटरटेनमेंट सहनिर्मित या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन, गिरीधर गोपाळकृष्ण धुमाळ हे निर्माते असून सौरभ लालवाणी हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांसारख्या दमदार कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट येत्या १८ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे