'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:11 IST2026-03-13T11:10:31+5:302026-03-13T11:11:06+5:30

Varsha Usgaonkar: एक काळ असा होता जेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल त्या थराला जायचे.

varsha-usgaonkar-fan-incident-happend-in-kolhapur-she-told-in-the-kapil-sharma-show | 'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा

'तो पहाटे 6.30 वाजता आला अन्...'; वर्षा उसगावंकरांनी सांगितला फॅनचा किस्सा

मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar). उत्तम अभिनय कौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर वर्षा यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. विशेष म्हणजे आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. एक काळ असा होता जेव्हा त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल त्या थराला जायचे. असाच एक अनुभव वर्षा यांना कोल्हापूरात आला होता. कपिल शर्मा शोमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला.

वर्षा उसगांवकर काही कामानिमित्त कोल्हापुरात गेल्या होत्या. यावेळी एक चाहता सकाळी चक्क ६.३० वाजता त्या रहात असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचला होता. परंतु, त्याने केलेल्या एका कृतीमुळे वर्षा त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या होत्या.

''कोल्हापुरात मी ज्या हॉटेलमध्ये रहात होते. तिथे एक चाहता सकाळी ६.३० वाजता आला होता. मला वाटलं एवढ्या सकाळी हॉटेलचा कोणीतरी सर्व्हिस बॉय आला असेल. त्यामुळे मी दरवाजा उघडला. आणि, पाहते तर समोर एक फॅन उभा होता'', असं वर्षा म्हणाल्या.

पुढे त्या म्हणतात, ''त्या चाहत्याला माझा ऑटोग्राफ हवा होता. त्यामुळे तो एवढ्या सकाळी माझी झोपमोड करायला आला होता. मात्र, त्याचा हा प्रताप पाहून मी त्याच्यावर चांगलीच संतापले होते.'' दरम्यान, वर्षा उसगांवकर यांनी अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच बॉलिवूड सिनेमांमध्येही त्या झळकल्या आहेत.
 

Web Title : ऑटोग्राफ के लिए एक फैन ने सुबह 6:30 बजे वर्षा उसगांवकर को जगाया।

Web Summary : अभिनेत्री वर्षा उसगांवकर ने कोल्हापुर की एक घटना सुनाई जहाँ एक प्रशंसक सुबह 6:30 बजे ऑटोग्राफ लेने के लिए उनके होटल पहुँच गया। इतनी सुबह जगाने से नाराज़ उसगांवकर ने प्रशंसक के दखल पर अपनी नाराजगी व्यक्त की। उन्होंने यह किस्सा द कपिल शर्मा शो में साझा किया।

Web Title : Fan wakes Varsha Usgaonkar at 6:30 AM for autograph.

Web Summary : Actress Varsha Usgaonkar recounts an incident in Kolhapur where a fan arrived at her hotel at 6:30 AM seeking an autograph. Irritated by the early wake-up call, Usgaonkar expressed her displeasure at the fan's intrusion. She shared this anecdote on The Kapil Sharma Show.