'सुभेदार'च्या सावित्रीबाईंनी केला नव्या घरात गृहप्रवेश; पाहा स्मिता शेवाळेच्या घराची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:54 PM2023-08-28T17:54:34+5:302023-08-28T17:55:21+5:30

Smita shewale: स्मिता शेवाळेने नुकतंच तिच्या हक्काचं स्वत:चं घर खरेदी केलं आहे.

subhedar-fame-actress-smita-shewale-buys-new-house watch-full-video-of-gruhapravesh | 'सुभेदार'च्या सावित्रीबाईंनी केला नव्या घरात गृहप्रवेश; पाहा स्मिता शेवाळेच्या घराची झलक

'सुभेदार'च्या सावित्रीबाईंनी केला नव्या घरात गृहप्रवेश; पाहा स्मिता शेवाळेच्या घराची झलक

googlenewsNext

आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र, सध्याच्या काळात घर घेणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, आर्थिक पाठबळ असण्याचीही तितकीच गरज आहे. त्यामुळे आज सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत असे कितीतरी जण आहेत जे मुंबईसारख्या शहरामध्ये घर घेण्यासाठी धडपड करत आहेत. यामध्येच नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

'सुभेदार' या सिनेमात अलिकडेच झळकलेली अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने नुकतंच तिच्या हक्काचं घर खरेदी केलं आहे. स्मिताने इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या घराचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या घराची झलक दाखवली आहे.  इतकंच नाही तर रसिक प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमामुळे घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं असंही तिने आवर्जुन यावेळी सांगितलं आहे. तसंच चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

'घर म्हणजे केवळ घर नसतं, असल्या जरी चार भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं....आपुलकीच्या झुरोक्यातून इथे प्रेमाचं वारं वाहत असतं...,' असं कॅप्शन देत स्मिताने तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

स्मिता मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध आणि तितकीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'यंदा कर्तव्य आहे', 'अथांग', 'कनिका', 'चल लव्ह कर', 'दम असेल तर', 'धामधूम', 'लाडी गोडी', 'वन रूम किचन', 'विठ्ठला', 'चारचौघी', 'मांडला दोन घडीचा डाव', 'वीर शिवाजी', 'मुरांबा' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. स्मिताला एक मुलगा असून कबीर असं त्याच नाव आहे.  अलिकडेच स्मिता दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' या सिनेमात झळकली. या सिनेमात तिने तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. 
 

Web Title: subhedar-fame-actress-smita-shewale-buys-new-house watch-full-video-of-gruhapravesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.