अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेच्या निधनानंतर पत्नी करतेय मुलांचा सांभाळ, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:00 AM2021-06-01T07:00:00+5:302021-06-01T07:00:03+5:30

लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्यावेळी दोन्ही मुलं खूपच लहान होती.

siddharth ray was married to famous actress shantipriya | अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेच्या निधनानंतर पत्नी करतेय मुलांचा सांभाळ, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

अशी ही बनवाबनवी फेम सिद्धार्थ रेच्या निधनानंतर पत्नी करतेय मुलांचा सांभाळ, आहे प्रसिद्ध अभिनेत्री

googlenewsNext

सिद्धार्थ रे ने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता अशी ही बनवाबनवी या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली शंतनूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. हा चित्रपट असंख्य वेळा प्रेक्षक पाहातात असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शंतनू या व्यक्तिरेखेमुळे सिद्धार्थ आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात आहे.

सिद्धार्थचे खरे नाव सुशांत रे असून तो व्ही शांताराम यांचा नातू होता. वंश, पहचान, युद्धपथ यांसारख्या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले नसल्याने त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या तितक्याशा लक्षात राहिल्या नाहीत. पण त्याचा बाजीगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात त्याने काजोलच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्याच्यावर चित्रीत झालेले छुपाना भी नही आता... हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तसेच आके तेरी बाहों में... हे प्रसिद्ध गाणे देखील त्याच्यावर चित्रीत झाले होते. सुशांतचे २००४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो त्यावेळी केवळ ४० वर्षांचा होता. चरस हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

सिद्धार्थची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अक्षय कुमारसोबत देखील काम केले आहे. अक्षयच्या सौंगध या पहिल्या चित्रपटामध्ये शांतिप्रिया ही त्याची नायिका होती. शांतिप्रिया ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. १९९९ मध्ये सिद्धार्थ आणि शांतिप्रिया यांनी लग्न केले. त्यांना दोन मुले देखील आहेत. लग्नाला पाच वर्षं पूर्ण झाल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू झाला. सिद्धार्थच्या मृत्यूच्यावेळी दोन्ही मुलं खूपच लहान होती. 

शांतिप्रियाने माता की चौकी-कलयुग में भक्ती की शक्ती आणि द्वारकादिश भगवान श्रीकृष्णा यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या शांतिप्रिया तिच्या दोन्ही मुलांचा एकटीने सांभाळ करत आहे. शांतिप्रिया दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री भानुप्रियाची छोटी बहीण आहे.

Web Title: siddharth ray was married to famous actress shantipriya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.