लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:09 IST2025-12-21T18:05:20+5:302025-12-21T18:09:50+5:30
सचिन-सुप्रिया यांनीही फॉलो केला ट्रेंड;'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ बघाच

लेट पण थेट! सचिन-सुप्रिया यांनी फॉलो केला ट्रेंड,'धुरंधर' मधील व्हायरल गाण्यावर केला जबरदस्त डान्स
Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar Dance Video: आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबाला पाहायला मिळतोय.या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यातील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका अगदी उत्तमरित्या वठवली आहे.दरम्यान, या चित्रपटाबरोबरच त्यातील अक्षय खन्नाच्या एन्ट्री सॉंगचीही तितकीच चर्चा होत आहे. अक्षय खन्नाच्या या 'शेर ए बलूच' या गाण्यातील डान्स स्टेप्सने सगळ्यांनाच वेड लावलं. अनेकजण या गाण्यावर रिल्स,व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. आता हा ट्रेंड फॉलो करत मराठीतील लोकप्रिय जोडी सचिन-सुप्रिया पिळगांवकर यांनी हटके डान्स केला आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं.आज सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस आहे. आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लेक श्रियाने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन-सुप्रिया यांच्यासह लेक श्रियानेही ठेका धरला आहे. धुरंधरमधील 'fa9la' या गाण्यावर ते अगदी बेभान होऊन डान्स करताना दिसत आहेत.व्हिडिओत दोघांची केमिस्ट्री आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
श्रियाने पिळगावकरने आई-वडिलांचा हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय, "यांची केमिस्ट्री! ४० वर्षांचं प्रेम, हास्य, स्टोरी, प्रगती, साथ आणि तो वेडेपणा कधीही कमी होऊ न देणं. पडद्यावर आणि पडद्यामागील सुंदर कथांसाठी आणि या सगळ्यात दररोज एकमेकांना निवडल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक बाबतीत तुम्ही आदर्श आहात. Love you my cuties...Happy Anniversary!" असं सुंदर कॅप्शन श्रियाने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी १९८५ साली लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ४० वर्ष झाली आहेत. त्यांना श्रीया पिळगावकर ही एकुलती एक मुलगी आहे