रितेशने म्हणुन ठेवले मुलाचे नाव रियान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 17:17 IST2016-11-25T17:17:48+5:302016-11-25T17:17:48+5:30

 रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच रियानचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. जेनेलियाने आपल्या लाडक्या लेकाला यावेळी ...

Ritesh named as the son's name Ryan | रितेशने म्हणुन ठेवले मुलाचे नाव रियान

रितेशने म्हणुन ठेवले मुलाचे नाव रियान

 
ितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच रियानचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. जेनेलियाने आपल्या लाडक्या लेकाला यावेळी सोशल साईट्सवर शुभेच्छा दिल्या. तर रितेशने यावेळी मुलाचे नाव रियान का ठेवले याचा एक झक्कास किस्सा नुकताच एका कार्यक्रमात शेअर केला आहे. आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे याची उत्सुकता तर सर्वच आई वडिलांना असते. तशीच काहीशी उत्सुकता रिेतेशला देखील रियानच्या जम्ना पुर्वी पासूनच होती. एके दिवशी तो  बंगीस्तानच्या शूटींगसाठी पोलंडमध्ये असताना रितेशच्या डोक्यात मुलाच्या नावाचाच घोळ सुरू होता. मुलगी होवो किंवा मुलगा नावाची सुरुवात र किंवा ज म्हणजेच रितेश आणि जेनेलियाच्या नावाच्या आद्याक्षरांपासून असावी असे त्यांना वाटत होते. संध्याकाळी हॉटेलच्या बाहेर बागेत जेनेलिया आणि रितेश भटकत असताना त्याला रिओन हे नाव सूचले. रियान हे नाव कसे वाटते ? असे त्याने जेनेलियाला विचारले. ती म्हणाली याचा अर्थ काय ? पण याचा अर्थ रितेशला माहिती नव्हता. जेनेलिया म्हणाली हे नाव कुठे ऐकलेस ? रितेश म्हणाला कुठेच नाही. मग दोघांनी या नावाचा अर्थ आॅनलाईन शोधला. रियानचा अर्थ होता 'छोटा राजा' किंवा 'राज्य करणारा'. हे एक जुने संस्कृत नाव असून अनेक भाषेत हे नाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मग काय आपल्या या छोट्या राजकुमारचे नाव त्यांनी रियान असे ठेवले. आता देशमुख घराण्यातील हा चिमुकला छोट्या राजा पेक्षा कमी आहे काय. नुकताच या दोघांनी रियानचा दुसरा वाढदिवस एकदम थाटामाटात साजरा केल्याचे समजतेय. 

Web Title: Ritesh named as the son's name Ryan