Raja Shivaji Box Office: ५ दिवसांत ५० कोटी! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा जगभरात डंका
By कोमल खांबे | Updated: May 6, 2026 12:33 IST2026-05-06T12:32:42+5:302026-05-06T12:33:32+5:30
'राजा शिवाजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात हा सिनेमा गाजतो आहे. सिनेमाचं ५ दिवसांचं कलेक्शन समोर आलं असून ५० कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे.

Raja Shivaji Box Office: ५ दिवसांत ५० कोटी! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'चा जगभरात डंका
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेल्या 'राजा शिवाजी' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक सिनेमातून छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं आहे. केवळ देशातच नव्हे तर जगभरात हा सिनेमा गाजतो आहे. सिनेमाचं ५ दिवसांचं कलेक्शन समोर आलं असून ५० कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला आहे.
'राजा शिवाजी' सिनेमाचे महाराष्ट्रातील शो हाऊसफूल होत आहेत. संपूर्ण देशभरात या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकंच नव्हे तर जगभरात 'राजा शिवाजी'चा डंका पाहायला मिळत आहे. देशात या सिनेमाने पाचव्या दिवशी जवळपास ५ कोटींची कमाई करत आत्तापर्यंत ४४.४० कोटी कमावले आहेत. तर जगभरात 'राजा शिवाजी'ने ५० कोटींचा आकडा गाठला आहे. लवकरच सिनेमा देशातही ५० कोटींचा आकडा पार करेल, अशी अपेक्षा आहे.
‘राजा शिवाजी' या भव्य चित्रपटाविषयी सांगायचं तर, भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित आणि अनुभवी कलाकारांचा सहभाग आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलीया देशमुख आणि रितेश विलासराव देशमुख यांसारख्या कलाकारांनी या ऐतिहासिक कथानकाला आपला भव्य कलात्मक आधार दिला आहे. विशेष म्हणजे रितेश विलासराव देशमुख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले असून, त्यांच्या दृष्टीकोनातून हा प्रकल्प अधिक भव्य स्वरूपात साकारला गेला आहे.