​ पंजाबी सैराट प्रदर्शनासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 16:11 IST2016-11-30T16:11:26+5:302016-11-30T16:11:26+5:30

 सैराट या चित्रपटाची झिंग सगळ्यांवर चढलेली दिसत होती. मराठीच काय तर बॉलिवूडमधील कलाकार देखील सैराटमय झाले होते. सैराट हा ...

Punjabi sarat ready for display | ​ पंजाबी सैराट प्रदर्शनासाठी सज्ज

​ पंजाबी सैराट प्रदर्शनासाठी सज्ज

 
ैराट या चित्रपटाची झिंग सगळ्यांवर चढलेली दिसत होती. मराठीच काय तर बॉलिवूडमधील कलाकार देखील सैराटमय झाले होते. सैराट हा चित्रपट अनेक भाषांमध्ये आता तयार होणार असल्याने  प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच आता हिंदीमध्ये देखील आपल्याला आर्ची-परशाची ही प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याने आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा झिंगाटचे वारे वाहू लागले आहे. भव्य-दिव्य चित्रपटांसाठी ओळखला जाणारा करण जोहर या मराठमोळ्या आणि रांगड्या चित्रपटाला कसे सादर करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. हिंदी चित्रपटामध्ये आपल्याला जान्हवी कपूर आणि इशान कपूर हे दोघए आर्ची-परशाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर जसा सैराट हिंदीत येणार आहे तसाच आता तो पंजाबी मध्ये येण्यासाठी सज्ज झाला आहे. झी स्टुडियो प्रस्तुत आणि व्हाईट हिल प्रॉडक्शन प्रस्तुत सैराट येत्या वर्षी म्हणजेच १४ जुलै २०१७ ला संपूर्ण जगभर प्रदर्शित होणार आहे. पंकज भत्रा या पंजाबी रिमेकचं दिग्दर्शन करणार आहे. परंतू या चित्रपटामधील प्रमुख भूमिका म्हणजेच सिनेमाची जान असलेले आर्ची-परशा कोणते कलाकार साकारणार हे मात्र समजलेले नाही. सैराटचे वेड फक्त महाराष्ट्रच नाही तर आता जगभरातील प्रेक्षकांना लागलेले आहे हेच यावरुन तरी दिसत आहे. आता पंजाबी मध्ये देखील झिंगाटचा आवाज घुमणार आहे. या पंजाबी तडका असलेल्या सैराटला प्रेक्षक किती पसंती दर्शवितात हे तर लवकरच समजेल. 
 
 

Web Title: Punjabi sarat ready for display