इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय प्रिया मराठे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 17:21 IST2017-07-13T11:51:13+5:302017-07-13T17:21:13+5:30

अभिनेत्री प्रिया मराठे परदेशातील निळाशार सागरी किनारा,इटली, फ्रान्स आणि स्पेनसारख्या आकर्षक लोकेशन्सला भेट देत मस्त व्हॅकेशन एन्जॉय करण्यात बिझी ...

Priya Marathe is excelling the whakshan in Italy | इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय प्रिया मराठे

इटलीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय प्रिया मराठे

िनेत्री प्रिया मराठे परदेशातील निळाशार सागरी किनारा,इटली, फ्रान्स आणि स्पेनसारख्या आकर्षक लोकेशन्सला भेट देत मस्त व्हॅकेशन एन्जॉय करण्यात बिझी आहे. तिने भेट दिलेल्या सगळ्या सुंदर लोकेशन्सची फोटो तिने तिच्या इन्स्ट्राग्रामवर शेअर केले आहेत.या फोटोत प्रिया मराठे ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.तिच्या या फोटोंना अनेक लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत इटलीमधल्या नयनरम्य स्थळांना भेट देत तिथली संस्कृती माहिती जाणून घेण्यात तिला रस असल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहेत. शेअर केलल्या  फोटोत ती निवांतपणे एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे.'पवित्र रिश्ता' या मालिकेती  वर्षा या भूमिकेमुळे  प्रिया मराठे घराघरात पोहचली.तसेच ही मालिका आजही इंडोनेशियामध्ये सुरु आहे.  त्यामुळे भारतात प्रमाणेच परदेशातही प्रिमा मराठेचे चाहते पाहायला मिळतात.प्रिया मराठेच्या करिअरच्या सुरूवातीला  सोशल नेटवर्किंग वगैरे असे काही नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष कुणी भेटले तर त्या रसिकांची मतं तिच्यापर्यंत पोहचायची. आता मात्र सोशल मीडियामुळे क्षणाक्षणाला रसिकांच्या प्रतिक्रिया येत असतात.तसेच  चाहत्यांशी थेट कनेक्ट होण्यासाठी ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती अपडेट करताना दिसते.'साथ निभाना साथियाँ'मालिकेत प्रिया नेगेटीव्ह भूमिका साकारत आहे.लेहंगा, भले मोठे दागदागिने, मोठी बिंदी, फुल ऑन गुजराती-राजस्थानी अशाप्रकारची भूमिका असून तिचा ऑरा काही निराळाच आहे. गुजराती आणि राजस्थानी भाषेचा सरमिसळ करत ती बोलताना दिसते.तिच्या या भूमिकेचेही रसिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Web Title: Priya Marathe is excelling the whakshan in Italy