याला म्हणतात संस्कृती! भर कार्यक्रमात बेर्डे कुटुंबीय अशोक सराफ यांच्या पाया पडले अन्...; पाहा व्हिडिओ
By कोमल खांबे | Updated: April 8, 2025 10:53 IST2025-04-08T10:53:13+5:302025-04-08T10:53:45+5:30
...अन् भर कार्यक्रमात प्रिया बेर्डेंनी अशोक सराफांना वाकून केला नमस्कार, व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव

याला म्हणतात संस्कृती! भर कार्यक्रमात बेर्डे कुटुंबीय अशोक सराफ यांच्या पाया पडले अन्...; पाहा व्हिडिओ
महाराष्ट्र भूषण आणि मराठीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवाजमवी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातअशोक सराफ यांच्यासोबत वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. नुकतंच 'अशी ही जमवाजमवी' या सिनेमाचा ग्रँड प्रिमियर सोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील अनेक सिनेतारकांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. प्रिया बेर्डेदेखील कुटुंबासोबत हजर होत्या.
'अशी ही जमवाजमवी' सिनेमाच्या प्रिमियर सोहळ्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अशी ही जमवाजमवी'च्या ग्रँड प्रिमियरला प्रिया बेर्डे यांनी लेक अभिनय बेर्डे आणि मुलगी स्वानंदी बेर्डे यांच्यासोबत उपस्थिती दर्शवली. यावेळी अशोक सराफ यांना पाहताच प्रिया बेर्डेंनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रिया यांच्यानंतर अभिनय आणि स्वानंदीनेदेखील अशोक सराफ यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडिओ पाहून चाहते भारवून गेले आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत बेर्डे कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, 'अशी ही जमवाजमवी' हा सिनेमा येत्या १० एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासोबत सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. ‘राजकमल एंटरटेनमेंट’ने या सिनेमाची निर्मिती केली आहे.