Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 10:17 IST2025-09-12T10:16:26+5:302025-09-12T10:17:15+5:30

'बिग लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या प्रीमिअरच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Priya Bapat was not paying attention to ashok saraf bin lagnachi goshta movie video viral | Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिग लग्नाची गोष्ट' हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाची खूप चर्चा होती. यानिमित्ताने प्रिया आणि उमेश हे दोघे नाटक आणि मालिकेनंतर अनेक वर्षांनी एकमेकांसोबत काम करत आहेत.  'बिग लग्नाची गोष्ट'चा प्रीमिअर बुधवारी पार पडला. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी एक मजेशीर प्रसंग बघायला मिळाला. अशोक सराफ हे गुपचुप प्रिया बापटच्या मागे उभे राहिले होते. पण प्रियाचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. पुढे काय घडलं?

अशोक सराफ प्रियाच्या मागे गुपचुप उभे होते अन्...

'बिग लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या प्रीमिअरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी प्रिया उमेशसोबत बोलण्यात व्यस्त होती. अशातच एक व्यक्ती तिला मागे बघ अशी खूण करतो. प्रियाच्या मागे अशोक सराफ उभे असतात. अशोक सराफ यांना पाहताच प्रिया बावरते. ती हसून तोंड लपवते. पुढे अशोकमामा आणि निवेदिता सराफ प्रियाची फिरकी घेताना दिसतात. प्रिया अशोकमामांच्या खांद्यावर डोकं ठेऊन प्रेमाने गप्पा मारताना दिसते. अशाप्रकारे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


'बिग लग्नाची गोष्ट' सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमातील उमेश कामत आणि प्रिया बापट ही जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दोघांसोबत गिरीश ओक आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडीदेखील चित्रपटात झळकणार आहे. या दोन जोड्यांच्या रंगतदार अभिनयामुळे ‘बिन लग्नाची गोष्ट’ प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरणार आहे. गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित ‘बिन लग्नाची गोष्ट’ सिनेमाची कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे.

Web Title: Priya Bapat was not paying attention to ashok saraf bin lagnachi goshta movie video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.