प्राजक्ता माळीसोबतचा हा मुलगा कोण आहे? वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:19 IST2019-06-10T13:19:17+5:302019-06-10T13:19:54+5:30

प्राजक्ता माळी सध्या व्हॅकेशन मुडमध्ये असून तिने तिच्या युरोप टूरचे फोटो फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत.

Prajakta Mali share picture with Unkonwn guy | प्राजक्ता माळीसोबतचा हा मुलगा कोण आहे? वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

प्राजक्ता माळीसोबतचा हा मुलगा कोण आहे? वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

ठळक मुद्देप्राजक्ताने फोटोसोबत लिहिले आहे की, माझे खूप सारे फोटो काढल्याबद्दल आणि माझ्यासोबत तू खूप फोटो काढल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. भावा... तू ही गोष्ट खूपच चांगल्याप्रकारे केलीस आणि तुझे नाव खूपच कुल आहे. छत्रपाल... जसा आहेस तसाच कायम राहा...

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य, अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

प्राजक्ता माळी सध्या व्हॅकेशन मुडमध्ये असून तिने तिच्या युरोप टूरचे फोटो फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर नुकतेच शेअर केले आहेत. आपल्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ काढून प्राजक्ता युरोप टूर एन्जॉय करताना दिसतेय. पण तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने एका मुलासोबत तिचे काही फोटो शेअर केले असून युरोपच्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा... असे लिहिले आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेला हा मुलगा कोण आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण या फोटोच्या खाली असलेले कॅप्शन वाचले तर या मुलाचे आणि प्राजक्ताचे नाते काय हे लगेचच लक्षात येत आहे. 

प्राजक्ताने या फोटोच्या कॅप्शनमध्ये हा मुलगा कोण आहे हे सांगितले आहे. हे कॅप्शन वाचल्यानंतर या मुलाला ती ब्रो अशी हाक मारत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेला हा मुलगा दुसरा कोणीही नसून तिचा भाऊ आहे हे आपल्याला कळत आहे. तिने फोटोसोबत लिहिले आहे की, माझे खूप सारे फोटो काढल्याबद्दल आणि माझ्यासोबत तू खूप फोटो काढल्याबद्दल मी तुझी आभारी आहे. भावा... तू ही गोष्ट खूपच चांगल्याप्रकारे केलीस आणि तुझे नाव खूपच कुल आहे. छत्रपाल... जसा आहेस तसाच कायम राहा...

हा फोटो पाहून प्राजक्ताच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला असल्याचे त्यांचे कमेंट पाहून आपल्याला कळत आहे. या फोटोवर कमेंट करण्याच्याआधी ब्रो हा शब्द वाचा असे एका युझरने म्हटले आहे तर दुसऱ्याने फोटो पाहून त्या मुलाविषयी तिरस्कार वाटू लागला होता. पण ब्रो वाचून खूपच बरे वाटले. तर एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ब्रो वाचल्यावर जीव भांड्यात पडला. तर एकाने तर फोटो पाहिल्यावर मला हृदयविकाराचा धक्का बसतोय का असे मला वाटत होते. पण आता कॅप्शन वाचून बरे वाटले असे लिहिले आहे.  

Web Title: Prajakta Mali share picture with Unkonwn guy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.