फनरल: 'राजा रानीची गं जोडी' फेम 'या' अभिनेत्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 17:44 IST2022-06-16T17:43:42+5:302022-06-16T17:44:27+5:30
Funeral: काही दिवसांपूर्वीच 'फनरल' (funeral) हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चार मित्रांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटातून आयुष्य कसं जगावं हे सांगण्यात आलं आहे.

फनरल: 'राजा रानीची गं जोडी' फेम 'या' अभिनेत्याची रुपेरी पडद्यावर एन्ट्री
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'राजा रानीची गं जोडी' (raja rani chi g jodi). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. ढालेपाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्याने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. त्यातलंच एक नाव म्हणजे सुजित ढालेपाटील. संजूच्या धाकट्या दिराची भूमिका साकारणाऱ्या सुजितने अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्याने थेट रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली आहे.
'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत सुजित ढालेपाटील ही भूमिका अभिनेता पार्थ घाटगे (parth Ghatge) याने साकारली आहे. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर पार्थ आज तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी दररोज चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या त्याच्या फनरल या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच 'फनरल' (funeral) हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. चार मित्रांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटातून आयुष्य कसं जगावं हे सांगण्यात आलं आहे. याच चित्रपटात पार्थ घाटगे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकला आहे. या चित्रपटामध्ये पार्थने विनोद या मध्यमवर्गीय चाळीत राहणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान, पार्थ या चित्रपटात एका अयशस्वी ठरत असलेल्या इन्शुरन्स एजंटच्या रुपात दिसत असून त्याच्या मित्रांच्या मदतीने तो आयुष्य कसं सकारात्मकतेने जगतो हे सांगायचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या चौघांची कथा सांगणारा हा चित्रपट अल्पावधीत लोकप्रिय होताना दिसत आहे. इतकंच नाही तर पार्थची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडत असून सध्या सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा होताना दिसते.