राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:00 IST2025-01-28T16:59:53+5:302025-01-28T17:00:35+5:30

राज्यशासनातर्फे यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा; ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराची नामांकनं जाहीर

Marathi film festival in 2025 Ashish Shelar announced rajya shasan marathi movie nomination | राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा

राज्य शासनातर्फे यंदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव, आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षी अर्थात २०२५ पासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर ६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. 

गेल्या ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. मात्र शासनाचा अधिकृत असा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात नाही. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. मात्र शासनाचा अधिकृत असा महोत्सव नसल्याने यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली.

नामनिर्देशन विभागातील राज्य शासन पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे:


•    सर्वोत्कृष्ट कथा : 
१.    अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव) 
२.    पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन) 
३.    सुमित तांबे (समायरा )

•    उत्कृष्ट पटकथा : 
१.    इरावती कर्णिक (सनी) 
२.    पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन) 
३.    तेजस मोडक - सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी) 

•    उत्कृष्ट संवाद :
१.    प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२.    मकरंद माने (सोयरिक)
३.    सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

•    उत्कृष्ट गीते :
१.    प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे - यल्गार होऊ दे)
२.    अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)
३.    प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

•    उत्कृष्ट संगीत :
१.    हितेश मोडक (हर हर महादेव)
२.    निहार शेंबेकर (समायरा)
३.    विजय गवंडे (सोंग्या)

•    उत्कृष्ट पार्श्वसंगीत :
१.    अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२.    हनी सातमकर (आतुर)
३.    सौमिल सिध्दार्थ (सनी) 

•    उत्कृष्ट पार्श्वगायक :
१.    मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत - भेटला विठ्ठल माझा)
२.    पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत - का रे जीव जळला) 
३.    अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत - घे तुझ्यात सावलीत)

•    उत्कृष्ट पार्श्वगायिका :
१.    जुईली जोगळेकर (समायारा/गीत - सुंदर ते ध्यान)
२.    आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत - बाई ग कस करमत नाही)
३.    अमिता घुगरी (सोयरिक/गीत - तुला काय सांगु कैना)

•    उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :
१.    राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत - कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )
२.    उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे) 
३.    श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत - मी नाचणार भाई)

•    उत्कृष्ट अभिनेता :
१.    प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२.    वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)
३.    ललीत प्रभाकर (सनी)

•    उत्कष्ट अभिनेत्री :
१.    सई ताम्हणकर (पॉन्डीचेरी)
२.    अमृता खानविलकर(चंद्रमुखी)
३.    सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

•    उत्कृष्ट विनोदी अभिनेता :
१.    मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)
२.    संजय नार्वेकर (टाईमपास) 
३.    भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

•    सहाय्यक अभिनेता :
१.    योगेश सोमण (अनन्या)
२.    किशोर कदम (टेरीटरी)
३.    सुबोध भावे (हर हर महादेव)

•    सहाय्यक अभिनेत्री:
१.    स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)
२.    क्षिती जोग (सनी)
३.    मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

•    उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :
१.    अकुंर राठी (समायरा)
२.    रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)
३.    जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

•    उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री : 
१.    ऋता दुर्गुळे (अनन्या)
२.    सायली बांदकर (गाभ)
३.    मानसी भवालकर (सोयरिक)

•    प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :
१.    आतुर
२.    गुल्हर
३.    ह्या गोष्टीला नावच नाही 

•    प्रथम पदार्पण दिग्दर्शन :
१.    4 ब्लाइंड मेन
२.    गाभ
३.    अनन्या

सिनेमांसाठी नामांकनं:

सन 2022 या वर्षातील  साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी,धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, 4 ब्लाईंड मेन, समायरा,गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही,ग्लोबल आडगाव,हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे. 

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर(उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी(फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रन सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.  

परीक्षक कोण?

या स्पर्धेसाठी चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर,विजय भोपे,श्रीरंग आरस,राजा फडतरे,शरद सावंत,मेधा घाडगे,चैत्राली डोंगरे,विनोद गणात्रा,प्रकाश जाधव,शर्वरी पिल्लेई,जफर सुलतान,देवदत्त राऊत,विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.

Web Title: Marathi film festival in 2025 Ashish Shelar announced rajya shasan marathi movie nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.