'आयत्या घरात घरोबा'तील कानन आठवतेय? आता कशी दिसते सचिन पिळगावकरांची ऑनस्क्रीन बहीण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:29 IST2025-07-29T12:25:41+5:302025-07-29T12:29:32+5:30
कुठे गायब झाली 'आयत्या घरात घरोबा' सिनेमातील कानन? साध्या भोळ्या अभिनेत्रीचं बदललंल रुप

'आयत्या घरात घरोबा'तील कानन आठवतेय? आता कशी दिसते सचिन पिळगावकरांची ऑनस्क्रीन बहीण?
Aaytya Gharat Gharoba: 'आयत्या घरात घरोबा' हा मल्टिस्टार चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. या चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर तसेच लक्ष्मीकांत बेर्डे, किशोरी शहाणे, प्रशांत दामले अशा तगड्या कलाकारांची फळी पाहायला मिळाली. अशोक सराफ यांनी या चित्रपटात साकारलेली गोपूकाकांची भूमिका विशेष गाजली. घराचे मालक केदार किर्तीकर जेव्हा परदेशात जायचे तेव्हा हे गोपू काका सहा महिने त्या बंगल्यामध्ये राहतात. तिथून कथानकाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. दरम्यान, या चित्रपटात अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने कानन म्हणजेच सचिन पिळगावकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिच्याया भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. नंतर ही कानन लक्ष्मीकांत बेर्डेंच्या प्रेमात पडते. परंतु, आता ही अभिनेत्री काय करते ? याबद्दल जाणून घेऊया...
अभिनेत्री राजेश्वरी सचदेवने 'आयत्या घरात घरोबा' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पंजाबी कुडी म्हणून प्रसिद्ध झालेल्या राजेश्वरीने पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर अभिनेत्री हिंदी चित्रपटांकडे वळली. 'सरदारी बेगम', 'हरी भरी', 'द फरगॉटन हिरो', 'वेलकम टू सज्जनपूर' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं. तसंच 'डोंबिवली रिटर्न' या मराठी चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसली.
राजश्वरी सचदेव एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती थिएटर आर्टिस्ट, गायिका तसेच नृत्यांगना आहे. आता राजेश्वरी सचदेवचा लूक पूर्णपणे बदलला आहे. मात्र, फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रीने आजही भल्याभल्यांना टक्कर देते. राजेश्वरी सचदेव सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यावर वेगवेगळे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. अभिनेते वरुन वडोला यांच्यासोबत लग्न करुन ती संसारात रमली आहे. त्यांना देवाज्ञ नावाचा गोंडस मुलगा आहे. मात्र, अभिनय करणं तिने सोडलेलं नाही.