माधुरीपुढे करीनाही फेल; 'सन सनन'वर केला जबरदस्त डान्स, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 16:52 IST2024-06-05T16:52:08+5:302024-06-05T16:52:38+5:30
Madhuri pawar: माधुरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे.

माधुरीपुढे करीनाही फेल; 'सन सनन'वर केला जबरदस्त डान्स, पाहा Video
माधुरी पवार हे नाव मराठी कलाविश्वासाठी आता नवीन राहिलेलं नाही. अथक मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर माधुरीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. देवमाणूस मधील चंदा असो किंवा रानबाजारमधील प्रेरणा पाटील, प्रत्येक भूमिकेत माधुरीने जीव ओतून काम केलं. त्यामुळेच तिची प्रत्येक भूमिका गाजली. सिनेमांमुळे चर्चेत येणारी माधुरी सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे.
माधुरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. त्यामुळे ती नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात रहात असते. सोबतच सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंडही फॉलो करते. सध्या नेटकऱ्यांमध्ये करीना कपूरच्या 'सन सनन' या गाण्याची क्रेझ आहे. अनेकांनी त्यावर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यात माधुरीलाहा रील करायचा मोह आवरला नाही.
माधुरीने माळरानावर गडद निळी साडी नेसून सन सननन या गाण्यावर डान्स केला आहे. सोबतच तिचा भन्नाट डान्स व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअरदेखील केला आहे. माधुरीने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला असून तिचा व्हिडीओ सध्या लोकप्रिय ठरत आहे.