एवढी फिट कशी राहते हृता दुर्गुळे? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, शेअर केला जीममधील व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 14:00 IST2025-03-12T13:59:58+5:302025-03-12T14:00:29+5:30
अभिनयाबरोबरच हृता तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. यामागचं रहस्य आता समोर आलं आहे.

एवढी फिट कशी राहते हृता दुर्गुळे? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, शेअर केला जीममधील व्हिडिओ
महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फुलपाखरू मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हृताचा चाहता वर्ग मोठा आहे. हृताने अनेक मालिका, नाटक आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच हृता तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. यामागचं रहस्य आता समोर आलं आहे.
हृताने तिचं फिटनेस सीक्रेट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. फिट राहण्यासाठी हृता व्यायामाला महत्त्व दिसते. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरुन जीममधील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. त्याबरोबरच हृता खास डाएटही फॉलो करते. याचा फोटो देखील तिने शेअर केला आहे.
'फुलपाखरू' मालिकेतून हृता घराघरात पोहोचली. त्यानंतर 'दुर्वा' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमध्ये ती दिसली होती. 'टाइमपास ३', 'अनन्या', 'सर्किट', 'कन्नी' या सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. 'कमांडर करण सक्सेना' या हिंदी वेब सीरिजमध्येही हृता झळकली आहे.