Sonalee Kulkarni: आम्ही गोंधळी गोंधळी..., अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ, पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 17:12 IST2023-03-19T17:10:15+5:302023-03-19T17:12:08+5:30
Sonalee Kulkarni : सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे...

Sonalee Kulkarni: आम्ही गोंधळी गोंधळी..., अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ, पाहा VIDEO
सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या अख्खा महाराष्ट्र पालथा घालतेय. महाराष्ट्र टुरिझम या कार्यक्रमातून सगळ्यांना ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करुन देतेय. या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात सोनालीने अमरावतीला भेट दिली. याच भेटीचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओत सोनाली, गोंधळींसोबत अंबादेवीचा गोंधळ घालताना दिसतेय.
सोनालीने अमरावतीमधील प्रसिद्ध अशा अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी तिने मंदिरासमोर गोंधळही घातला. सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली गोंधळींबरोबर गोंधळ घालताना दिसत आहे.
“अंबादेवी मंदिरासमोर गोंधळींसोबत उत्स्फुर्तपणे गोंधळात सामिल होताना…”, अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
हीच आहे महाराष्ट्राची खरी संस्कृती, हे आहे अस्सल सोनं, व्वा सोना आज जिंकलंस तू, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
‘हा खेळ संचिताचा’ या मालिकेमध्ये काम करत असतानाच सोनालीला तिच्या पहिल्या मराठी चित्रपटाची ऑफर मिळाली होती. ‘गाढवाचं लग्न’ हा तिचा पहिला सिनेमा. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या मराठी चित्रपटातून सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि यानंतर कधीच मागे वळून बघितलं नाही. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटामुळे सोनाली प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर ती ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘धुरळा’, ‘हिरकणी’ या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली.