लंडनच्या रस्त्यावर सिद्धार्थने केला लेकीसोबत जबरदस्त डान्स; Video होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:18 IST2023-05-23T18:13:51+5:302023-05-23T18:18:34+5:30
Siddharth jadhav: सध्या सोशल मीडियावर त्याचा आणि त्याच्या धाकट्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो डान्स करताना दिसून येत आहे.

लंडनच्या रस्त्यावर सिद्धार्थने केला लेकीसोबत जबरदस्त डान्स; Video होतोय व्हायरल
उत्तम अभिनयशैली आणि हटके फॅशनसेन्स यामुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव (siddharth jadhav). आजवरच्या कारकिर्दीत सिद्धार्थने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याने आपली जागा निर्माण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर त्याचा आणि त्याच्या धाकट्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तो डान्स करताना दिसून येत आहे.
सध्या सिद्धार्थ त्याच्या मुलींसोबत क्वालिटी टाइम घालवत आहे. सिद्धार्थ त्याच्या दोन्ही मुलींसह लंडनला व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला आहे. येथील अनेक फोटो, व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्येच त्याने एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून तो त्याच्या मुलीसोबत भररस्त्यात डान्स करत आहे.
सिनेमागृहाबाहेर वडिलांनी पेपरवर झोपून काढले दिवस; त्यासमोरच्या टॉवरमध्ये घेतलं सिद्धार्थने घर
दरम्यान, सिद्धार्थने पार्टनर सिनेमातील Do U Wanna Partner या गाण्यावर लेकीसोबत ताल धरला आहे. यावेळी या दोघांमध्ये असलेल्या बाप-लेकीच्या नात्याचं अनेकांनी कौतुर केलं आहे. एक वडील म्हणून मुलांसोबत कसं वागलं पाहिजे हे तुझ्याकडून शिकावं असं म्हणत अनेकांनी सिद्धार्थवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.