लेक आणि जावयासोबत मिलिंद गवळींनी पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 17:29 IST2025-04-27T17:25:30+5:302025-04-27T17:29:03+5:30
मिलिंद गवळींनी मुलगी आणि जावयासोबत पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..."

लेक आणि जावयासोबत मिलिंद गवळींनी पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- "हा शो माझ्यासाठी खास कारण..."
Milind Gawali Post: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत 'झापुक झुपूक' चित्रपट २५ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा होती. केदार शिंदे दिग्दर्शित 'झापुक झुपूक' चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता या चित्रपटात झळकलेले मराठी अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
'झापुक झुपूक' या सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये तुफान गर्दी करताना दिसत आहेत. अशातच मिलिंद गवळींनी पुण्यातील एका चित्रपट गृहातील व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलंय, "काल पुण्याला माझ्या लेकी आणि माझ्या जावयाबरोबर झापुक झूपुक पुन्हा पाहायला गेलो. आमच्याबरोबर माझे चंद्रकांत दाजी आणि दिपाची मोठी बहीण भावना, हे सुद्धा बरोबर होते. भावना आणि चंद्रकांत दाजी यांनी आजपर्यंत माझा कुठलाही पुण्यामधल्या चित्रपटाचा प्रीमियर शो मिस केलेला नाहीये. प्रभातला १९९४ मध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित "आई" चित्रपटाच्या प्रीमियरला सुद्धा ते हजर होते, इतक्या वर्षात २६-२७ चित्रपटांचे प्रीमियर त्या दोघांनी attend केले आहेत. असा सपोर्ट ते कायम मला देत आलेले आहेत. तर कालचा "झापुक झुपूक" चा शो माझ्या साठी फारच खास होता, कुटुंबाबरोबर आणि प्रेक्षकांबरोबर माझा चित्रपट बघायला, त्यांचे reactions अनुभवायला मिळाले, तो आनंद खूप वेगळा असतो.
त्यानंतर मिलींद गवळींनी लिहिलंय, "इतकी वर्ष ग्रामीण भागामध्ये प्रेक्षकांचे reactions मला जवळून पाहायला मिळाले होते, शहरी लोकांचे multiplexes मधल्या प्रेक्षकांचे reactions खूप कमी अनुभवायला मिळाले आहेत मला, कालचे positive reactions बघून छान वाटलं. हा जरी शहरांमध्ये मल्टिप्लेक्स मध्ये लागला असला तरी याचा प्रेक्षक वर्ग खूप वेगळा आहे , माझ्या झापुक झुपूक चित्रपटाचा प्रेक्षक हा intellectual किंवा pseudo intellectual नाहीये, हा प्रेक्षक ज्याला थिएटरमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर कर्मणूक , entertainment हवी असते, सिनेमामधून फार डोक्याला shot नको असतो. आणि आमचा झापुक झुपूक Fullon entertain करतो. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाला आवडला, वडिलांना, बायकोला, लेकीला, जावयाला, माझ्या साडूला, अक्कड सासूला, माझ्या मित्रांना, माझ्याकडे काम करणाऱ्यांना, या सगळ्यांना आवडला म्हणजे मी भरून पावलो, आता तो प्रेक्षकांना पण नक्कीच आवडणार याची मला याची खात्री आहे." असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.